Kolhapur Crime: संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका शुभदा पाटील, एपीआय राहुल राऊतला तपासासाठी फिरवले; घराची झाडाझडती, बँक तपशीलही मागवला
उद्योजक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी कुटुंबासह केलेल्या सामूहिक आत्महत्येनंतर गडहिंग्लज पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. शुभदा पाटील आणि राहुल राऊत यांना मंगळवारी तपासासाठी फिरवले.
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज शहरातील उद्योजक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी कुटुंबासह केलेल्या सामूहिक आत्महत्येनंतर गडहिंग्लज पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. संतोष शिंदे यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास दिलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊत यांना मंगळवारी तपासासाठी फिरवले. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतानाच बँक खात्याचा तपशीलही मागवल्याची माहिती आहे. एपीआय राहुल राऊत हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यामधीलच असून त्याचे गाव निलजी आहे. गावातील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकलेली नाही.
नगरसेविका शुभदा पाटीलला सुद्धा तपासासाठी फिरवले.
पोलिसांनी राहुलच्या घराची झडती घेतानाच तपासाचा भाग म्हणून शुभदा पाटीलच्या घराची सुद्धा झडती घेतली. माजी नगरसेविका असलेल्य शुभदा पाटीलच्या आजरा मार्गावर असलेल्या घरात आणण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घराजवळ पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तात पोलिसांनी घराची झडती घेतली.
माजी नगरसेविकेच्या पतीच्या मृत्यूची चौकशी करावी
दरम्यान, संतोष शिंदे यांनी भयावह पद्धतीने आत्महत्या केल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊतला त्वरित निलंबित करावे. तसेच माजी नगरसेविका शुभदा पाटीलच्या पतीच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा अर्जुनसह आत्महत्या केल्यानंतर गहहिंग्लज तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे. सुसाईड नोटमध्ये शुभदा आणि राहुलच्या नावाचा उल्लेख होता. शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुभदा पाटील आणि राहुल राऊतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर दोघेही फरार झाले होते. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने शिताफीने तपास करताना त्यांना सोलापुरातून उचलले होते. ते एका हाॅटेलमध्ये लपून बसले होते. ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केल्यानंर त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर शुभदा पाटील आणि राहुल राऊतने एक कोटीच्या खंडणीसाठी केलेला मानसिक छळ यामुळे संतोष शिंदे यांनी टोकाचे पाऊल उचलताना कुटुंबाचा अंत केला होता. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या