एक्स्प्लोर

Raju Shetti on BRS : बीआरएसकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर; राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट, पण स्वतंत्र लढण्याचा व्यक्त केला निर्धार

Raju Shetti on BRS : केसीआर यांच्याकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करु असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, केंद्रीय कोअर कमिटीमध्येही आपणास सदस्य करु असे सांगण्यात आले होते.

Raju Shetti on BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष  केंद्रित केलं आहे. बीआरएसच्या चालीमागील डाव आहे तरी कोणाचा? अशी राजकीय पटलावर चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti on BRS) यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. राजू शेट्टी यांनी या ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे. शेट्टी यांनी सांगितले की, मला देखील मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव संपर्कात आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआर यांनी दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असून स्वतंत्र राहून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

चंद्रशेखर राव हे माझे 2009 पासून चांगले मित्र

त्यांनी पुढे सांगितले की, "केसीआर यांच्याकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करु असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, केंद्रीय कोअर कमिटीमध्येही आपणास सदस्य करु असे म्हटले होते." शेट्टी पुढे म्हणाले की, "मला मात्र आता कोणत्याही पक्षात जायचं नाही. त्यामुळे मी त्यांना नकार दिला आहे." ते म्हणाले की, "के चंद्रशेखर राव हे माझे 2009 पासून चांगले मित्र आहेत."

तर केसीआर यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती वाटेल

राजू शेट्टी यांनी यावेळी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वी 'सबका साथ सबका विकास' म्हणत भाजपने आमची फसवणूक केली आहे. त्यांचे गुजरात मॉडेल फोल ठरलं आहे. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा अशा कोणत्याही पॅटर्नमुळे फसवणूक होणार नाही याची खात्री करुन घेणे गरजेचं आहे." दरम्यान, राजू शेट्टी यांनी चंद्रशेखर राव यांच्या बाबतीत सूचक वक्तव्यही केले. ते म्हणाले की, "चंद्रशेखर राव हे प्रामाणिकपणे जर त्यांचा अजेंडा चालणार असतील, तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती वाटेल."

भारत राष्ट्र समितीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद 

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभर केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते. सरकोलीमध्ये भगिरथ भालके यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरु असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget