एक्स्प्लोर

Kolhapur Crime : इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दहशत कायम ठेवण्यासाठी चार तरुणांना अमानुष मारहाण; नरड्यावर पाय ठेवत लोखंडी सळीने मारहाण

दहशत कायम राहावी यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा सुद्धा तपासामध्ये समोर आलं आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांकडून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्यात आलं आहे का? अशीच परिस्थिती आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून हत्यांची मालिका सुरू असताना जाता इचलकरंजीमधील सुद्धा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. इचलकरंजीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार तरुणांना बेदम मारहाण केल्याचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपी मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड श्याम लाखेचा हा व्हिडिओ आहे. 

इचलकरंजीमध्ये संतापाची लाट पसरली

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाचे इतरांनी हात पाय धरले असून श्याम लाखे बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. या घटनेनंतर इचलकरंजीमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लोखंडी सळीने श्याम लाखे मारहाण करताना दिसून येत आहे. या मारहाण प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दहशत कायम राहावी यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा सुद्धा तपासामध्ये समोर आलं आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांकडून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्यात आलं आहे का? अशीच परिस्थिती या व्हायरल व्हिडिओमधून समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खुन्नस देण्याचे प्रकार सुद्धा वाढीस लागले आहेत. खुन्नस देण्यातून खून होण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे या घटनांना कुठेतरी पायबंद घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. 

कोल्हापुरात अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या होत असतानाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळीयुद्ध उद्भवलं आहे. विशेष करून झोपडपट्ट्यांमध्ये दादागिरीचे प्रकार समोर येत आहेत. आता याच मालिकेमधील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. टोळीयुद्धातील गुन्हेगारांकडून दोघांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काठी फुटेपर्यंत दोघांना मारल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. दोघांना काठीने अमानुष मारहाण होत असताना बाजूला असलेले काहीजण हसताना दिसून येत आहेत. त्यामुळे हा नेमका प्रकार हा आहे तरी काय? असाच प्रश्न हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित झाला आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आणि विशेष करून सोशल मीडियामधील खुन्नसमधून खून होण्याचे प्रकार घडले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget