एक्स्प्लोर

Rohit Pawar In Belgaum : मी बेळगावला जाऊ शकतो, तर सीमा समन्वयक मंत्री दोनवेळा सांगूनही का जात नाहीत? आमदार रोहित पवारांचा थेट सवाल

Rohit Pawar In Belgaum : मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली.

Rohit Pawar In Belgaum : मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. रोहित पवार यांनी आज अचानक बेळगाव दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलताना भाजपवर तोफ डागली. रोहित पवार म्हणाले की, बेळगावात गेल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच्या नेत्यांशी, नागरिकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण शरद पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर वातावरण बदलून गेले. पवार साहेबांचा संवाद अनेक वर्षांपासून सीमाभागात (maharashtra karnataka border dispute) आहे. कार्यकर्त्यांना डांबण्याचा प्रयत्न होत होता, पण पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर परिस्थिती निवळली  आहे. 

भाजपचे नेते सांगूनही बेळगावला का गेले नाहीत

ते पुढे म्हणाले की, बेळगावला जाण्यासाठी वेगळं कारण नव्हतं.  माझे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत. आपलं घर असल्यासारखं वाटतं. त्यामुळे कुणाला विचारण्याची गरज नाही. केंद्रात, राज्यात आणि  कर्नाटकात अशी तिन्हीकडे भाजपची (BJP) सत्ता आहे. दोन तारखा देऊनही सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? कर्नाटकच्या (maharashtra karnataka border dispute) पत्रानंतर मंत्री जात नसतील, तर सीमाभागात योग्य संदेश जात नाही. भाजपचे नेते सांगूनही बेळगावला का गेले नाहीत, हे अगोदर सांगावे.

रोहित पवार यांनी सांगितले की, अनेक लोकांना मी आलेलो माहीत नव्हतं. अनेकजण येऊन भेटले. बोलताना जय महाराष्ट्र म्हणाले, ही अस्मितेची लढाई असून आम्ही ती लढत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बंगळूरमध्ये शिवरायांचा अवमान झाल्यानंतर आम्ही निदर्शने करण्यास परवानगी मागितली तेव्हा 45 दिवस बेळगावमधील कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आले. हे अस्मितेच्या विरोधात असल्याने लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवल्याचे  रोहित पवार यांनी सांगितले. 

तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल?

दरम्यान, रोहित पवार यांनी महापुरुषांचा वारंवार अवमान होत असेल, तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल? अशी विचारणा केली. ते म्हणाले की, पुण्यातील बंदला  छोटे दुकानदार व्यापारी यांनी सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अस्मिता टिकवण्यासाठीच लोक एकत्र आले आहेत. राज्यपाल पत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले. मात्र, माफी मागितली नाही. अमित शहा यांच्याऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते.संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला लोकं माफ करणार नाहीत. अशी किती पत्र लिहिले तरी लोक माफ करणार नाहीत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
IND vs ENG 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, चार वर्षानंतर वेगवान गोलंदाजाचं कमबॅक, आर्चरला संधी, कुणाला डच्चू?
इंग्लंडनं पुन्हा डाव खेळला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर,जोफ्रा आर्चरचं कमबॅक, कुणाला डच्चू ?
आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात; संजय राऊतांचा पलटवार
आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात; संजय राऊतांचा पलटवार
भाजप आमदाराला सहआरोपी करा, रविंद्र धंगेंकरांची मागणी; महिला पोलीस विनयभंगवरुन महायुतीत जुंपली?
भाजप आमदाराला सहआरोपी करा, रविंद्र धंगेंकरांची मागणी; महिला पोलीस विनयभंगवरुन महायुतीत जुंपली?
जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO
जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO
Embed widget