एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update: कळंबा तलाव जून महिन्यातच ओव्हर फ्लो; कोल्हापुरात पावसाची संततधार
Kolhapur Rain Update: दरवर्षी हा कळंबा तलाव ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हर फ्लो होत असतो. मात्र यावेळी असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच छोटे तलाव शंभर टक्के भरले आहेत.
Kolhapur Rain Update
1/10

कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला असलेला कळंबा तलाव यावर्षी जून महिन्यामध्ये ओव्हर फ्लो झाला आहे.
2/10

दरवर्षी हा कळंबा तलाव ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हर फ्लो होत असतो.
3/10

मात्र, यावेळी असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच छोटे तलाव शंभर टक्के भरले आहेत.
4/10

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत.
5/10

याच कळंबा तलावाच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक खूप मोठ्या संख्येने येत असतात.
6/10

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची आजही संततधार कायम आहे.
7/10

पंचगंगा नदी सुद्धा पहिल्यांदाच मोसमात पात्राबाहेर पडली आहे.
8/10

आज (25 जून) पंचगंगा नदीची दुपारी दोन वाजता पाणी पातळी 34 फूट 3 इंचांवर पोहोचली आहे.
9/10

कोल्हापूर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
10/10

दुसरीकडे, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे लघू प्रकल्प सुद्धा भरला आहे.
Published at : 25 Jun 2025 03:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























