जेव्हा सई ताम्हणकरने Crime Beat वेब सिरीजमध्ये दिला होता लेस्बियन किसिंग सीन VIDEO
Sai Tamhankar lesbian kissing scene : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने एका वेब सिरीजमध्ये लेस्बियन किसिंग सीन दिला होता.

Sai Tamhankar lesbian kissing scene : मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आता हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमधूनही आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. या अभिनेत्री बड्या प्रोजेक्ट्समध्ये झळकत असून, त्यांच्या अभिनयाचं मोठं कौतुक होत आहे. सई ताम्हणकर हाही असाच एक चेहरा, जिने मराठीबरोबरच हिंदी प्रेक्षकांनाही आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. दरम्यान, सई ताम्हणकर हिने अनेक सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन दिलेलेही पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये सई ताम्हणकरने लेस्बियन किसिंग सीन दिला होता. तिने ‘क्राइम बीट’ या वेब सिरीजमध्ये भरभरुन किसिंग सीन दिले होते. या वेबसिरीजमध्ये मराठीतील अनेक कलाकरांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
या वेबसीरिजमध्ये सईसोबत साकीब सलीम, राहुल भट्ट, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, किशोर कदम यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. साकीब एक धाडसी पत्रकार साकारतोय जो एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या कहाणीचा माग घेतोय. तर राहुल भट्ट, जो ‘केनेडी’ चित्रपटातून चर्चेत आला, तो खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला पाहायला मिळाला होता. या टीझरमध्ये कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळा आणि त्यामागचं राजकीय गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळतं. आदिनाथ कोठारे एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात पाहायला मिळाला होता.. तर अभिनेत्री सबा आझाद देखील सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
सई ताम्हणकरच्या लिपलॉक सीनची रंगली होती चर्चा
टीझरमध्ये विविध गंभीर आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य असलं, तरी सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक सीन विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. तिचा बोल्ड अंदाज याहीवेळी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. स्विमिंग पूलमध्ये दाखवलेला हा दृश्य क्षणभर लक्ष खिळवतो. तिच्या पात्राचं पूर्ण स्वरूप अद्याप गुलदस्त्यात आहे, पण टीझरमधून तिची धाडसी भूमिका स्पष्टपणे जाणवते.
कुठे पाहाता येईल ही वेबसिरीज
सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांची ही वेब सिरीज Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज पाहाता येईल..
प्रियाच्या किसिंग सीनची पुन्हा आठवण
सईच्या या बोल्ड सीननंतर अनेकांना अभिनेत्री प्रिया बापटच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेबसीरिजमधील दृश्यांची आठवण झाली. डिज्नी प्लस हॉटस्टारवरील या सीरिजच्या पहिल्या भागात प्रियाचा एक लेस्बियन किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला होता. आता सईच्या नव्या अंदाजाबद्दलही तिच्या सहकलाकारांकडून कौतुक होत आहे. प्रियानेही सईला ‘Bring it on सई’ असं म्हणत पाठींबा दर्शवला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























