एक्स्प्लोर

BLOG : साकीब नाचन... पहलगाम ते पडघा- बोरीवली कनेक्शन

BLOG : भिवंडी नाशिक हायवेवर पडघा-बोरिवली गाव हे स्वतंत्र मुस्लिम बहुल राष्ट्र घोषित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यातून समोर आला आहे. या गावाला सीरियासारख्या भूमीत रूपांतरित करण्याची योजना आखण्यात आल्याचं एनआएचं म्हणणं आहे आणि ही देशविघातक कृत्य कुठे सुरु आहे, तर भारताची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या वेशीवर, अवघ्या ५० किमी अंतरावर.

जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला गेला. आपले अनेक हिंदू बांधव मारले गेले. त्यानंतर आपल्या भारत सरकारनं दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानात जाऊन त्यांचे अड्डे उद्धवस्त केले. यानंतर चिडलेल्या पाकिस्ताननं भारतावर भाड्य हल्ला केला. त्यालाही भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. हे खरंतर युद्ध झालं मैदानातलं, पण यापलिकडे एक वेगळं युद्ध असतं ते म्हणजे स्लीपर सेलचं.

नुकतीच एनआयएनं आयसीसशी संबंधित अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. देशभरात अनेक ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी केली. यात एकट्या ठाणे जिल्ह्यात ४१ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ज्यात कल्याण, भिवंडी आणि ठाण्याचा राबोडी परिसर आणि मीरा भाईंदरचा यात समावेश आहे. ही छापेमारी ही किती महत्त्वाची आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

या कारवाईचे अनेक अर्थ आणि तितकंच गांभीर्यही आहे. कारण जर दहशतवाद्याचं दिवास्वप्न सत्यात उतरलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. इराक, इराणनंतर भारतासारख्या सार्वभौमत्व असणाऱ्या देशाच्या अखंडतेसाठी हा काळा डाग ठरला असता, परंतू आपल्या यंत्रणा सक्षम आहेत. त्यांनी या देशद्रोह्यांचे सगळे मनसुबे उधळून लावले.

महाराष्ट्र आयसीसच्या दहशतवादी मॉड्यूलवर छाप्यादरम्यान एनआयएनं मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रं, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यातलचं एक मुख्य नाव म्हणजे साकीब नाचन. जो गेल्यावेळी यंत्रणांच्या हाती लागला नव्हता.

साकीब पकडला जाणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण साकीब स्वत:ला खलिफा म्हणजेच अल्लाहाचा उत्तराधिकारी समजत होता. त्याने पद्धतशीरपणे इसिसशी संबंधित एक-एक गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून करायला सुरुवात केली होती.

पडघा-बोरीवली हे भिवंडीजवळचं नाशिक हायवेवरचं गाव. त्यालगतच असलेल्या सुमारे सात हजार लोकवस्तीच्या बोरिवलीत कोकणी मुस्लीम बहुसंख्य आहेत. इथेच साकीबचं कुटुंब राहतं. साकिब अकरा भावंडांमधला तिसरा.

मुंबईतल्या तीन बाँबस्फोटांप्रकरणी २००२-२००३ दरम्यान मध्ये साकिबचं नाव चर्चेत आलं. १९९० पासूनच साकीब तपासयंत्रणांच्या रडारवर होता, त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान ११ खटले चालले आहेत आणि साधारण १५ वर्ष तो तुरुंगातही जाऊन आला आहे.

एकेकाळी ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं.

३ ऑगस्ट २०१२ रोजी भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे मनोज रायचा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, त्यातही साकीब आरोपी होता, याशिवाय गोरक्षकांचे वकिल ललित जैन यांची २००२ साली हत्या करण्यात आली होती, त्यातही तो आरोपी होता.

हाच साकीब नाचन इसिसकडे वळला. तरुणांना आयसिस विचारधारेकडे वळवायचं, दहशतवादी प्रशिक्षणं द्यायची, स्वत:ची दहशत निर्माण करायची, असे नानाविध उद्योग त्याने चालू केले होते. जमिनी बळकावणं आणि तिथे दाखवायला म्हणून बकरी फार्म सुरु करणं अशा अनेक गोष्टी तो आपल्या गावात करु लागला होता. इतकंच काय तर आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेल्या डेव्हलपर्सच्या क्षेत्रात साकीबनं अप्रत्यक्षपणे विकासांना पैसे देवून गुंतवणूक केली.

केवळ हेच गाव नव्हे तर माहुली किल्ला डोंगर परिसर, पाश्चापूर अशा अनेक गावांमध्ये त्यानं आपलं जाळं विणायला सुरुवात केली होती अशा काही बाबी तपासातून समोर आल्या आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, साकिब नाचन, विदेशी हँडलर्सच्या निर्देशानुसार इसिसचा हिंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी आयईडी बनवण्यासह दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे गुंतला होता. 

साकिबनं इसिसचे जाळं घट्ट करण्यासाठी अनेक तरुणांना बायथ म्हणजे शपथ दिली आहे. ही शपथ काय होती तर इसिसशी एकनिष्ठ राहायचं. हे तरुण केवळ गरीब आहेत असं नव्हे तर त्यांच्या उच्चशिक्षित तरुणांचं त्यानं ब्रेनवॉशिंग केल्याचं तपासातून पुढे आलं आहे. इतकंच नव्हे तर इसिसमध्ये सामील झालेल्या तरुणांना पडघा-बोरिवलीत आणून त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण याच भागात दिलं जायचं आणि हे सगळं धर्माच्या अभ्यासाच्या नावाखाली याच गावाचं नामांतर 'अल शाम' करण्यात आलं होतं. अल शाम म्हणजे मुक्त क्षेत्रं. 

यासाठी १५ तरुणांना जबाबदारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या दहशतवादी साकिब नाचनच्या घराची एटीएस आणि ठाणे पोलिसांनी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईचे अनेक अर्थ आणि तितकंच गांभीर्यही आहे. ⁠भारताविरोधात देशविघातक कृत्य करण्याकरिता स्लिपर सेल तयार केला होता. स्लिपर सेलच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम स्लिपर सेल करायचा. ⁠हा स्लिपर सेल म्हणजे एक प्रकारे शरीयत ए अल शाम कायद्यानुसार काम करत होता. 

मंत्रिमंडळ तयार केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. याकरता १५ तरुणांना जबाबदारी दिली होती. ज्यांना एखाद्या देशाच्या मंत्र्यांप्रमाणे अधिकार दिले होते, तसेच अधिकार या तरुणांना देण्यात आले होते अशी गोपनीय माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. ⁠वेगळा देश म्हणून बोरीवली भागाला या शरीयत-ए-अल शाम असं हे मॉडेल कार्यकरत होतं. जर दहशतवाद्याचं दिवास्वप्न सत्यात उतरलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. इराक, इराणनंतर भारतासारख्या सार्वभौमत्व असणाऱ्या देशाच्या अखंडतेसाठी हा काळा डाग ठरला असता, परंतू आपल्या यंत्रणा सक्षम आहेत. त्यांनी या देशद्रोह्यांचे सगळे मनसुबे उधळून लावले.

महाराष्ट्र आयसीसच्या दहशतवादी मॉड्यूलवर छाप्यादरम्यान एनआयएनं मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुक, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रं, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यातलचं एक मुख्य नाव म्हणजे साकीब नाचन. जो गेल्यावेळी यंत्रणांच्या हाती लागला नव्हता.

शरियत कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. इसिसचा जो शरियत कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे, त्यानुसार पुरुषांना दाढी राखणे, वेशभूषा याबाबत शरियतमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत, तर महिलांना बुरखा सक्ती आहे, त्यांनी शिक्षण घेणं, नोकरी करण्यास शरियतमध्ये मनाई आहे. इतकंच नाही चित्रपट आणि संगीत ऐकण्यावरही यात बंधनं आणली आहेत. हेच सगळं बोरिवलीत लागू करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

इस्लामिक स्टेट आयसीस प्रामुख्यानं इराक आणि सीरियामध्ये उदयास आलेली जिहादी संघटना असून हिंसाचार आणि कट्टरता वादामुळे कुप्रसिद्ध आहे. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२० पर्यंत ६६ भारतीय वंशाचे हल्लेखोर आयसीसमध्ये सहभागी झाले होते. तर एनआयएच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२१ पर्यंत १६८ जणांना आयसिसशी संबंधित कारवायांसाठी अटक करण्यात आली.

साकीबनं यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान तर उभं केलं होतं, तुर्तास त्याला लगाम घातला गेला आहे असं म्हणता येईल. त्याचं नेटवर्क तोडणं अत्यंत गरजेचं होतं, कारण भारताच्या पोटात इसिससारख्या कारवायांना थारा नाही, याचं सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर आणि ऑपेरशन सिंदुरनंतर भारतातील स्लीप सेल सक्रीय होणार असा कयास बांधला जातो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात छापेमारी सुरु आहे. ठाणे, पडघा-बोरिवली, कोंढवे असे जागोजागचे साकिब नाचन वेचून काढून वेळीच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. भारताचा देशप्रेमी नागरिक म्हणून आपणही डोळे उघडे ठेवणं, सजग राहणं आणि काही संशयास्पद आढळल्यास लागलीच यंत्रणांना कळवणं आवश्यक आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Embed widget