एक्स्प्लोर

Hasan Mushrif ED Raid : ईडीची छापेमारी किती मोठे षड्यंत्र, याचा हा धडधडीत पुरावा!, हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ केला पोस्ट

हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना रंगला असतानाच आता थेट व्हिडिओ व्हायरल करत किती छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना रंगला असतानाच आता थेट व्हिडिओ व्हायरल करत किती छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते (Hasan Mushrif ED Raid) याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 33 सेकंदाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करताना किरीट सोमय्या हे कशा पद्धतीने मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत आहेत हे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

मुश्रीफ यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

षड्यंत्राचा हा घ्या पुरावा.........
घरावर रेड सुरू असतानाच किरीट सोमय्या म्हणाले, "हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी कमिटमेंट पूर्ण केली......!"
बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी सहा वाजता  कागलमधील घरावर ईडीची रेड पडली. रेड सुरू असतानाच एबीपी माझाच्या महिला अँकरने किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोन केला. त्याचवेळी सोमय्या दुसऱ्या फोनवरून पलीकडील व्यक्तीला सांगत होते, "हसन मुश्रीफच्या घरावर रेड सुरू झाली आहे, दिल्लीवाल्यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केली."
यावरूनच हे किती मोठे षडयंत्र रचले आहे, याचा हा धडधडीत पुरावा आहे.
पाहा हा व्हिडिओ.....

दरम्यान, ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मुश्रीफ यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध होणार का? याची चर्चा रंगली आहे. मागील दौऱ्यात सोमय्यांना कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे उद्या परिस्थिती तशी उद्भवणार का? याकडे आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पायरी सुरू असतानाच आता समर्थकही आता आक्रमक झाले आहेत. शनिवारी मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने, सूर्यकांत पाटील यांच्यासह समर्थकांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावह हल्लाबोल केला. घाटगे फक्त जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असल्याचे टीका करत मुश्रीफ राजर्षी शाहू महाराज विचारांचे वारसदार असल्याचा असल्याचे भैय्या माने म्हणाले. सूर्यकांत पाटील यांनीही घाटगे यांना जोरदार टोला लगावताना आम्ही तोंड उघडल्यास पळताभुई थोडी होईल, असा इशारा दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Pandharpur Crime News: वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
Embed widget