एक्स्प्लोर

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर उद्या किरीट सोमय्या कोल्हापुरात

Kirit Somaiya Kolhapur : माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या (Hasan Mushrif ED Raid) कारवाईनंतर पाच दिवसांमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

Kirit Somaiya Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे मातब्बर नेते माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या (Hasan Mushrif ED Raid) कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुश्रीफांनी या दौऱ्याला विरोध होणार नाही, त्यांनी खुशाल यावं असं सांगितलं असले, तरी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता तणाव निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ टार्गेट 

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना किरीट सोमय्या यांच्याकडून टार्गेट केले जात आहे. सातत्याने त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवताना ईडी कारवाई होणार असे सांगत आले आहेत. बुधवारी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. कागल, कोल्हापूर आणि पुणे अशा तीन ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान, किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने उद्या कोल्हापुरात पोहोचतील. यानंतर ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून सातारसाठी दुपारी दोनच्या सुमारास रवाना होणार आहेत. 

किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावर हसन मुश्रीफ काय म्हणाले?

कारवाईनंतर हसन मुश्रीफ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरून (Hasan Mushrif ED Raid) तसेच किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावं. अंबाबाईचे दर्शन घ्यावं आणि आम्ही केलेल्या कामांचा देखील आढावा घ्यावा. आमचा एकही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही. ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांवर दबाव असतो त्यामुळे या छाप्यादरम्यान (Hasan Mushrif ED Raid) त्यांची कोणतीही चूक नाही. 

मुश्रीफ घाई नको, तुमचा नंबर दुसरा : किरीट सोमय्या

एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. केवळ हसन मुश्रीफच नाही अनिल परबही आहे आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल, अशीही स्पष्टोक्ती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget