Gunratna Sadavarte: माध्यमं होती म्हणून मी वाचलो, नाहीतर माझा पुण्यातच एन्काऊंटर झाला असता; गुणरत्न सदावर्तेंचा दावा
आता व्हाॅट्सअॅप जिहाद सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
Gunratna Sadavarte : दाऊद इब्राहिमचा विचार आम्ही या राज्यात चालू देणार नाही, जे जे वाईट असेल त्याला धडा शिकवणार आहे. लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात आमचा लढा सुरु राहणार असून आता व्हाॅट्सअॅप जिहाद सुरु आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिणार असल्याचे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी म्हटले आहे. व्हाॅट्सअॅप जिहादवर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
एसटीच्या अन्य दोन महत्त्वाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील
सदावर्ते यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. "मी संजय राऊत यांच्यासारखी पत्रकारिता पाहिलेली नाही. त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांना कळत नाही. त्यांच्या बोलण्याला मी केराची टोपली दाखवतो, नाही तर माझा पुण्यातच एन्काऊंटर झाला असता, माध्यमे होती म्हणून मी वाचलो," असा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान एसटीच्या प्रलंबित मागण्यांवर बोलताना सदावर्ते म्हणाले की "एसटीच्या विलिनीकरण या संदर्भातील दोन महत्त्वाच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. अन्य दोन महत्त्वाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल, 2 ते 3 जिल्ह्यातील कौटुंबिक पक्ष असल्याची टीका
गुणरत्न सदावर्ते बोलताना म्हणाले की, "असदुद्दीन ओवेसी यांचे अनेक व्हाॅट्सअॅप ग्रुप आहेत." "निगेटिव्ह स्टेटमेंट करुन देशामध्ये दुफळी माजवत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी सदावर्ते यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल करताना हा पक्ष 2 ते 3 जिल्ह्यातील कौटुंबिक पक्ष असल्याची टीका केली.
ते म्हणाले की, एसटीच्या आर्थिक नाड्या आमच्या हातात आल्यानंतर शरद पवार संपतील. त्यांनी पुढे सांगितले की शरद पवार व्हायरस नष्ट करणे आमचे कर्तव्य आहे. शरद पवार यांचा व्हेरियंट अनेक सहकारी क्षेत्रात पसरला आहे. तो बाजूला करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोल्हापूर दंगलीवर बोलताना ते म्हणाले की या पावन भूमीत काही घटना घडल्या. जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यापूर्वी जाणीपूर्वक जेलमध्ये टाकले जात होत ते आता बंद झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या