एक्स्प्लोर

Raju Shetti: गायरान अतिक्रमणे कायम करण्यासाठी राजू शेट्टींचा एल्गार;19 जुलैला विधानभवनावर मोर्चा धडकणार 

गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी विशाल मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. या मोर्चाला राज्यातील प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

Gayran Encrochment : गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी 19 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखला आहे, एकाही अतिक्रमण धारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

बुधवारी 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता हा विशाल मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. या मोर्चाला राज्यातील प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. बीआरएस, पीसीपीआय, सीपीआय (एम), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, आरपीआय (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, सीपीआय (एमएल) सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. या पक्षाचे आमदार देखील या प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडणार आहेत. राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी 19 जुलै रोजी हक्काच्या लढाईसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजर रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

न्यायालय निर्णय नावाने बेदखल करून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे सरकारी षड्यंत्राचा, आम्ही तीव्र निषेध करतो त्याचबरोबर पहिल्यांदा धनदांडग्याची, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने हटवावीत, भूमीहिनांच्या घर व वहिवाटी शेतीहक्काचे संरक्षण करावे, गावरान, गावठाण, वनविभाग जमिनिवरील पिढयानपिढ्या वर्षांनुवर्षे राहते घर व शेती करून पोट भरणाऱ्या भूमिहिनांना जमीन वाटप व्हावे, त्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रित आले आहेत.

राजू शेट्टी म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून कोट्यवधी गरीब लोक हे भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद निजामानी सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, बतने, इनाम सोबत दिल्या होत्या. तेच लोक आज अतिक्रमणधारक महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जवळपास साडेपाच लाख कुटूंबेही स्वतःच्या राहत्या घराच्या व वहिवाटी शेतीच्या मालकीपासून कोसो मिल दूर असल्यामुळे सध्या राज्यातील लाखो गोरगरीब भूमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget