(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचा शनिवारी सर्वपक्षीय नागरी सत्कार
संपूर्ण आयुष्य शेतकरी, गोरगरीब व वंचितांसाठी खर्ची घातलेल्या शेकापचे माजी आमदार संपतराव पवार- पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
Kolhapur News : संपूर्ण आयुष्य शेतकरी, गोरगरीब आणि वंचितांसाठी खर्ची घातलेल्या शेकापचे माजी आमदार संपतराव पवार- पाटील (Sampatrao pawar patil) यांचा उद्या अमृतमहोत्सवानिमित्त सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार आहे. संपतबापू यांचा 31 जानेवारीला अमृतमहोत्सवी वाढदिवस होत असल्याने उद्या नागरी सत्कारासह आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव समितीचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आहेत.
अमृतमहोत्सवानिमित्त आगामी वर्षभरात वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा, महाआरोग्य शिबिर, शेतकरी तसेच महिला मेळावा, शरीरसौष्ठत्व स्पर्धा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कुस्ती मैदान, होम मिनिस्टर स्पर्धा आदींचे आयोजन केले आहे.
संपतराव पवार महाविद्यालयीन जीवनापासून चळवळीशी जोडले गेले आहेत. गेल्या पाच दशकांपासून सामान्यांच्या प्रश्नावर ते आवाज उठवत आहेत. करवीर तालुक्यातील सडोली खालसा सरपंच, भोगावत साखर कारखान्याचे संचालक, उपाध्यक्ष ते सांगरुळ मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 16 जानेवारीपासून सडोली खालसा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव समितीचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सडोली गावचे सरपंच ते भोगावती सहकारी साखर कारखान्याचे पाच वर्षे उपाध्यक्ष, 15 वर्षे संचालक, 10 वर्षे सांगरूळ मतदारसंघातून आमदार, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार, अशा विविध ठिकाणी संपतबापू यांनी अजोड काम केले. सत्ता असो वा नसो त्याची तमा न बाळगता गोरगरिबांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. न थकता त्यांनी गोरगरिबांसाठी आंदोलने केली आणि आजही ते रस्त्यावरच्या आंदोलनात आग्रस्थानी असतात. जिल्ह्यातील टोल आंदोलनात बापूंनी केलेले आंदोलन आजही विसरता न येणारे आहे."
इतर महत्वाच्या बातम्या