Dhananjay Mahadik on Satej Patil: आम्ही कधी म्हटलं नाही एकटे पडलो आहोत, नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला
Dhananjay Mahadik on Satej Patil: सतेज पाटील यांनी आता आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी नव्याने सुरु केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपण एकटं पडलो असल्याची भावना बोलून दाखवली होती.

Dhananjay Mahadik on Satej Patil: कोणत्याही स्थितीत गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने गोकुळच्या निवडणुकीमध्ये अचानक कलाटणी मिळाली होती. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. या निवडणुकीमुळे गोकुळमधील नेते सतेज पाटील यांना तगडा झटका बसला. त्यांच्या गटाकडून शशिकांत पाटील यांची चर्चा होती. मात्र, ऐनवेळीमुख्यमंत्र्यांनी केलेला हस्तक्षेपामुळे उमेदवार बदलावा लागला. अर्थात या सर्व रणनीतीमागे महाडिक गटाचा हात होता, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी नव्याने सुरु केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपण एकटं पडलो असल्याची भावना बोलून दाखवली होती.
आता सतेज पाटलांच्या एकटेपणाच्या भावनेवर भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा आता खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. मात्र, कधी नाराज व्हायचं नसतं. आम्ही कधी म्हटलं नाही की आम्ही एकटे पडलो आहोत. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये माझा घात झाला होता. विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता. गोकुळमधील आमची सत्ता गेली होती. मात्र, आम्ही कधी नाराज झालो नाही. आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच
दरम्यान, गोकुळमध्ये होत असलेल्या पक्षीय राजकारणामुळे अध्यक्ष कोणाचा अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, खासदार महाडिक यांनी गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच असल्याचे म्हणत हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले की, विरोधकांचे संचालक आजही गोकुळमध्ये आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच कामाला लागले आहेत. गोकुळची निवडणूक वर्षभरात होणार आहे, विरोधकांनी प्रचार करायचा नाही का? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सुरू आहे. सध्या शिवसेनेमधील, काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी येत आहेत. भविष्यामध्ये भाजपमध्येही अनेक नेते येतील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशातील 140 कोटी जनतेला सोबत घेऊन 11 वर्षात देशाची प्रगती केली. भाजप सरकारने गरिबांची सेवा केली, सरकार म्हणजे सेवा होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जनतेला आपण जबाबदार असतो हे दाखवून दिले. युपीए काळात अनेक घोटाळ्याची मालिका पाहायला मिळाली होती. मात्र, 2014 नंतर विकासाचे राजकारण देशातील नागरिकांना पाहायला मिळले. नागरिकांच्या प्रत्यक्षात भागवण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























