एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात चमत्कार झाला! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले

Kolhapur News: एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे.

कोल्हापूर: आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. घरी सर्व पाहूणे जमले, अंत्यविधीची तयारी झाली, त्यानंतर रुग्णालयातून घरी अंतयात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली. 

एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत.

नेमकं काय घडलं?

सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उलपे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई उलपे त्या ठिकाणी आल्या, तेव्हा पांडुरंग उलपे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावलं. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहचली आणि जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले. सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली.

दरम्यान, रूग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले. तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Santosh Deshmukh case: CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Embed widget