एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Crime : कोल्हापुरात प्रमुख भागात भटक्या कुत्र्यांचा धसका; बिंदू चौकात पर्यटकाच्या पायाचा तोडला लचका

कोल्हापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत चालली आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद अधिक गंभीर होत चालला आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात गेल्या आठवडाभरापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत चालली आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद (stray dog in kolhapur) अधिक गंभीर होत चालल्याने स्थानिकांसह पर्यटकांनी धास्ती घेतली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक नेहमीच पर्यटकांनी गजबलेला असतो. मात्र, त्याच बिंदू  चौकात या आठवडाभरात तीन पर्यटकांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडला आहे. त्यामुळे पर्यटक चांगलेच घाबरून गेले आहेत. सोमवारी दुपारी एका पर्यटकाचा लचका तोडल्याने स्थानिकांसह पर्यटकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. (Kolhapur Crime)

कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून सहली तसेच पर्यटकांनी फुलून गेले आहे. त्यामुळे आणखी कोणी भटक्या कुत्र्यांच्या तोंडी लागू नये म्हणून कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार करूनही अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी पाचगावमधील एका लहान मुलाच्या नाकावर कुत्र्याने चावा घेतला होता. 

प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य

कोल्हापूर शहराच्या प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने गेल्यानंतर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. बिंदू चौक, मटण मार्केट परिसरात कुत्र्यांच्या चांगल्याच टोळ्या आहेत. रात्री दहा ते पहाटेपर्यंत त्यांचा ठिय्या असतो.  ठिय्या मारुन कुत्री बसल्याने काही वेळेला चार चाकी वाहनधारकांना रस्त्यावरच थांबावे लागते. तसेच कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, चायनीज दुकाने, कत्तलखाने परिसरात कुत्र्यांच्या झुंडींची दहशत आहे. चायनीजच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. चायनीजमधील कामगार जवळील कचरा कोंडाळी किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. शिल्लक अन्न, मांस, हाडे रस्त्याच्या कडेलाच टाकली जात असल्याने कुत्र्यांना हे खाद्य मिळते.

Kolhapur Crime  : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्‍त करा

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत असतानाच पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणेत भटक्या कुत्र्यांनी आत्तापर्यंत चौघांचा चावा घेतला आहे. यामध्ये एका मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने योग्य ती कारवाई तत्‍काळ करावी, असे निवेदन अमित चोपडे नामक तरुणाने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून जिल्‍हा परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी तरूणाने केली आहे. 

Kolhapur Crime  : इचलकरंजीत कुत्र्यांचे निर्बिजीकरण होणार 

दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पाहता इचलकरंजी महापालिकेकडून (Ichalkaranji) पावले उचलण्यात येत आहेत. इचलकरंजीत तीन वर्षानी  पुन्हा एकदा निर्बिजीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. इचलकरंजी शहरामध्येही गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिन्यांमध्ये दीड हजारांवर भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. प्रथमच नर आणि मादी या दोन्हींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. (Kolhapur Crime)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यताHarshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Embed widget