(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaskar Jadhav : भाजपचं फक्त एकच लक्ष, दुसऱ्याचे पक्ष फोडणे, आपलं सरकार टिकवणे; राज्यात लोकं किड्या मुंग्या सारखे मरत आहेत; भास्कर जाधवांचा प्रहार
Bhaskar Jadhav : आमच्या नेत्यांनी तोंड घालू नयेत, ते मेले काय, गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचा आणखी छळ व्हावा यातच मला आनंद अशा शब्दात त्यांनी शिंदे गटातील होणाऱ्या घडामोडींवर भाष्य केले.
कोल्हापूर : भाजपच्या विकासाच्या फक्त गप्पा आहेत, विकास फक्त धनदांडग्यांचा होत आहे. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे, विकास फक्त भाजपला आपल्या चेल्यांचा करायचा आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
त्यांचा आणखी छळ व्हावा यातच मला आनंद
पालकमंत्री सुधारित जाहीर करण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, आमच्या लोकांना काही काम नाही. त्यांना मंत्रिपद मिळू दे अगर नाही मिळू दे, त्यांची चौकशी करण्याचे आपल्याला काय पडलं आहे? अशी विचारणा त्यांनी केली. आमच्या नेत्यांनी तोंड घालू नयेत, ते मेले काय, गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचा आणखी छळ व्हावा यातच मला आनंद अशा शब्दात त्यांनी शिंदे गटातील होणाऱ्या घडामोडींवर भाष्य केले.
फडणवीस स्टे देण्याचे काम करत आहेत
भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्यावरही खोचक टीका केली. ते म्हणाले की, अजितदादांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्टे सोडा, विरोध करण्याचे धाडसही राज्याचा कोणताही मुख्यमंत्री करत नव्हता. आज त्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री स्टे देतात. दोन्ही मुख्यमंत्र्यांना घटनात्मक अधिकार नसतानाही फडणवीस स्टे देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दादांना खायचे दात वेगळे दिसले होते, आता त्यांना दाखवायचे दात वेगळे दिसत असीतल. शिंदे गट आणि दादा यांचे मूल्यमापन भाजपने व्यवस्थित केलं आहे.
दीड वर्ष झालं तरी उद्धव ठाकरे यांना दोष देतात
आरक्षण संदर्भात बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी ही पूर्वीपासूनच होती. आरक्षणाचा उद्रेक व्हायला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पहिली कॅबिनेट झालेली आठवत नाही. मराठा समाजाला आघाडी सरकारच्या काळात 2014 ला आरक्षण मिळाले होते, लाभही मिळाला होता. देवेंद्र फडणीस यांचं सरकार आलं, आरक्षण गेलं. सरकार बदलून दीड वर्ष झालं तरी उद्धव ठाकरे यांना दोष देतात.
राज्यात लोकं किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत
कोरोनाचा काळ असताना उद्धव ठाकरे यांनी मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक समजाला शब्द द्यायचा, त्यांना फसवण्याचा उद्योग भाजपने सुरु केला आहे. 2024 ला देशात आणि राज्यात भाजपचे सरकार येणार नाही. प्रत्येक समाजाला दुखावण्याचं कामं, नाराज करण्याचं कामं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केले. भाजपचे फक्त एकच लक्ष आहे, दुसऱ्याचे पक्ष फोडणे आणि आपले सरकार टिकवणे हेच आहे. जनतेकडे यांचं लक्ष नाही, कुठलही संकट नसताना राज्यात लोकं किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या