Dhairyasheel Mane : बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना घरातल्यांसाठी काढली नव्हती; खासदार धैर्यशील माने
बाळासाहेबांच्या विचारांची दिवाळी आज कोल्हापुरात साजरी होत असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. बाळासाहेबांच्या पैलवानांने कोल्हापुरात शड्डू ठोकून सलामी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कुटुंबासाठी काढली नव्हती तर सर्वसामान्य नागरिकांसाठी काढली होती. गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली, त्यानंतर हू इज एकनाथ शिंदे अशी विचारणा होऊ लागली. यामध्ये गुगलचं रेकाॅर्ड मोडलं, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. शिंदे गटाची आज कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा झाली. शिवसेना शिंदे गटाचे दोनदिवसीय महाअधिवेशन पार पडल्यानंतर गांधी मैदानात सभा पार पडली. या सभेत बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी निधी मिळाला नसल्याची टीका केली. शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
बाळासाहेबांच्या पैलवानांने कोल्हापुरात शड्डू ठोकून सलामी दिली
शिवसेना शिंदे गटाच्या अधिवेशनानंतर ही जाहीर सभा होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व नेते उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विचारांची दिवाळी आज कोल्हापुरात साजरी होत असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. बाळासाहेबांच्या पैलवानांने कोल्हापुरात शड्डू ठोकून सलामी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
गांधी मैदान आणि शिवसेनेची सभा हे समीकरण
खासदार संजय मंडलिक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गांधी मैदान आणि शिवसेनेची सभा हे समीकरण आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सभा याच मैदानात होत होती. जे कोल्हापुरात पिकतं ते राज्यभर विकलं जातं. आम्ही खासदार म्हणून निवडून आलो त्यावेळी शिवसेनेचे 6 आमदार होते. नंतर एकच आमदार निवडून आला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या, पण आम्हाला काम करण्यासाठी निधीच मिळाला नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि कोल्हापूरला हजारो कोटी निधी यायला लागला, असे संजय मंडलिक म्हणाले.
शिंदेसारख्या पैलवानाने चितपट केलेल्या पैलवनाची हाड कडकडा मोडली
आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे सारख्या पैलवानाने चितपट केलेल्या पैलवनाची हाड कडकडा मोडली. रावणाला सीतेनं टाकलेली काडी उचलता आली नाही, तशी शिंदे यांच्या दाढीचा केस उद्धव ठाकरेंनी उचलल्यास तर तुमच्या घरात काम करतो, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मंदिर उभा केलं असून त्याचा वारसा एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या