एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप; 39 जणांना नोटीस

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दोन आरोग्य निरीक्षकांवरही दैनंदिन काम जबाबदारीने न केल्याने दंडाची कारवाई करण्यात आली आहे.  

ठेकेदार भोसलेच्या कामातील दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून 24 हजार दंडाची शिक्षा करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रंमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश भोसलेला देण्यात आले होते. 

या कामाचा कार्यादेश 15 फेब्रुवारी 2022 रोजी ठेकेंदार यांना देण्यात येऊन या कामास 180 दिवस मुदत दिलेली आहे. संबंधीत ठेकेदार भोसलेला विहित मुदतीत काम चालू केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंड ठोठावण्याची सूचना उप-शहर अभियंतांना दिली. त्याप्रमाणे विभागीय कार्यालय क्र.2 ने ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांना त्यांच्या अदा करावयाच्या बिलातून विलंब आकार 24 हजार कपात केला. 

आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व करण लाटवडेंना दंड

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक निरिक्षक राजेंद्र पाटील यांना 2 हजार रुपयांचा दंड तर आरोग्य निरिक्षक करण लाटवडे यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सदरचा दंड त्यांच्या पगारातून वसूल केला जाईल. शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव, डर्टी स्पॉटचे सौंदर्यीकरण, नाला/चॅनेल सफाई करणेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना फिरतीवेळी ए-3 चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व ई-3 चे आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांच्या भागामध्ये दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्याचे निदर्शनास आले.

दिलेल्या जबाबदारीनुसार दैनंदिन काम केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी करण लाटवडे यांना व राजेंद्र पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागितला होता. या दोघांचा खुलासा आल्यानंतर प्रशासकांनी अमान्य करुन दंड ठोठावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget