Ajit Pawar kolhapur Visit : अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर; चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने हलकर्णीत नागरी सत्कार
विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. चंदगड तालुक्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीत नागरी सत्कारासह शेतकरी मेळावा होईल.
Ajit Pawar kolhapur Visit : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar kolhapur Visit) रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. चंदगड तालुक्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीत नागरी सत्कारासह शेतकरी मेळावा होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कारही होणार असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या कालावधीत अजित पवार यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघाच्या विकासकामांसाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यासाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश टोपे, आमदार जयंत पाटील यांचेही सहकार्य लाभले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. तरीही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान गेल्या मार्चच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केले.
तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. पवार यांनी यापूर्वीही तालुक्याच्या विकासाला मोठा हातभार लावला आहे. पाटबंधारे प्रकल्पामुळे तालुक्यात सोळा लाख टन ऊस उत्पादन होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांचा नागरी सत्कार (Ajit Pawar kolhapur Visit) करण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी केले आहे.
महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश
निकालामध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. भाजप- शिंदे गटानेही जोरदार मुसुंडी मारली आहे. जिल्ह्यात 474 पैकी 45 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे 429 गावांसाठी निवडणूक पार पडली. दरम्यान, महाविकास आघाडीचे वर्चस्व सर्वच तालुक्यात दिसून आले. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता मिळवलेल्यांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच आहेत. यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), जनसुराज्य, शेकाप सरपंचांचाही समावेश आहे.
दरम्यान, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांत पूर्वीच्याच लोकांना सरपंच म्हणून स्वीकारले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जाहीर झालेल्या 429 पैकी 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून 231 ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम ठेवण्यात यश आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या