(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kumbhi Sakhar Karkhana : कुंभी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर, नरकेंविरोधात सर्व गट एकत्र येण्याची चिन्हे
कुंभी कासारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम (Kumbhi Sakhar Karkhana Election) जाहीर झाला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.
Kumbhi Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कुंभी कासारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम (Kumbhi Sakhar Karkhana Election) जाहीर झाला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कारखान्यासाठी 18 प्रतिनिधी आहेत. यामध्ये महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्ग प्रतिनिधी 1 मागासवर्गीय प्रतिनिधी 1 भटक्या व विमुक्त जाती जमाती 1 प्रतिनिधी आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर (Kumbhi Sakhar Karkhana Election) होताच व्यूव्हरचनेसाठी बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. निवडणूक कार्यक्रम कालावधी 35 दिवसांचा आहे. यापूर्वी, 29 नोव्हेंबरला सभासदांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. कच्च्या मतदारयादीवर हरकती आल्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी 23 हजार 64 सभासद व ब वर्ग सभासद 364 अशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. दुसरीकडे राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या.
औरंगाबाद खंडपीठाने सहकारी संस्थांच्या ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आल्या होत्या. त्या टप्यावरून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर 21 डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करून निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदिप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कुंभी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. मात्र, कोरोना महामारीने निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Kumbhi Sakhar Karkhana Election : असा असेल निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 6 ते 12 जानेवारी
- उमेदवारी अर्ज छाननी - 13 जानेवारी
- नामनिर्देशन व अंतिम उमेदवार यादी- 16 जानेवारी
- उमेदवारी अर्ज माघार - 17 ते 30 जानेवारी
- चिन्ह वाटप - 31 जानेवारी
- मतदान - 12 फेब्रुवारी
- मतमोजणी - 14 फेब्रुवारी
सत्ताधारी नरके गटाविरोधात सर्व गट एकत्र येण्याची चिन्हे
दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी गटातून हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये नरके गटाला घेण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी नरके गटाविरोधात विरोधातील (Kumbhi Sakhar Karkhana Election) सर्व गट शाहू आघाडीच्या माध्यमातून लढणार आहेत. विरोधी शाहू आघाडीची यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी नरके विरोधक सर्व गटांनी शाहू आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येण्यासाठी एकमत करण्यात आले. या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करताना दोन दिवसात पॅनलची घोषणा करणार असल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या