एक्स्प्लोर

अन्नदात्यासाठी अन्नत्याग... 19 मार्चला 'किसानपुत्र' एकवटणार

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) आहेत. त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली.

मुंबई : शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी येत्या 19 मार्च रोजी राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. एक दिवस उपोषण करुन ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ असे हे आंदोलन असेल. अमर हबीब यांनी काय आवाहन केले आहे? “अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे कुठल्या एका संघटनेचे आंदोलन नाही. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करु शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. आपण व्यक्तिगत करु शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करु शकता. कामावर असताना करु शकता, हवे तर एके ठिकाणी बसून करु शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र व पुत्रींनी यात हिरीरीने भाग घ्यावा.”, असे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) आहेत. त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली. उपोषणाची तारीख 19 मार्च का? साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही.  म्हणून अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता. ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 32 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. अमर हबीब सहकऱ्यांसोबत पवनारमध्ये उपोषणाला बसणार पवनार येथे स्वत: अमर हबीब यांच्यासोबत प्रशांत हमदापुरकर, अभिजित फाळके, किशोर माथनकर, अॅड दिनेश शर्मा, ज्ञानेश वाकुडकर यांसह अनेकजण उपोषण करणार आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा या वर्षीही 19 मार्चला हे आंदोलन होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
Embed widget