एक्स्प्लोर

Online Game: ऑनलाइन गेमच्या नादात 45 लाख गमावले, गाडी आणि शेतही विकलं

Online Game: ऑनलाइन गेमच्या नादात जालन्यातील एका तरुणाने 45 लाख रुपये गमावले असल्याची घटना समोर आली आहे.

Fraud In Online Game: ऑनलाइन गेमचं वेड एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. जालना जिल्ह्यातील ढगी गावच्या एका तरुणाला यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या गेमच्या नादात त्यांना आपली शेती तसेच चारचाकी वाहन देखील विकावं लागलं आहे. आता तो एक टपरीवर आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. 

परमेश्वर केंद्रे या 35 वर्षीय तरुणाला कोरना काळात घर बसल्या ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला होत. या नादातून ऑनलाइन गेमवर पैसे कमावण्याची लालसा निर्माण झाली होती. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात फक्त परमेश्वरच नव्हे तर कुटुंबियांनादेखील हा त्रास सहन करावा लागत आहे. 
 
कसे गमावले पैसे?

मोस्टबेट (Mostbet) हा ऑनलाइन गेम परमेश्वर च्या आर्थिक ऱ्हासाला कारणीभूत ठरला आहे. विशेष म्हणजे हा ऑनलाइन प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. परमेश्वरने गुगल क्रोम वरून या गेमची लिंक डाउनलोड केली.  सुरुवातीला 100 रुपये नंतर 200 नंतर 500 रुपये अशी गेममध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला दीड वर्षात त्याला याचा चांगला मोबदला मिळत होता. दरम्यान या काळात त्याचं गेमचं वेड आणखी वाढत गेलं आणि शेकडोंची गुंतवणूक हजार आणि लाखांवर गेली. परतावा घटू लागला. हळूहळू परमेश्वरवर मित्रांचे कर्ज वाढलं आणि ते फेडण्यासाठी त्याने सुरुवातीला आपली चार चाकी महिंद्रा स्कार्पिओ विकली. मात्र त्यातही कर्ज फिटत नसल्याने त्याने दोन महिन्यापूर्वी एक एकर शेत देखील विकलं.

गेम मधून दुप्पट परतवा मिळण्याच्या आमिषाने परमेश्वरने दोन वर्षात 45 लाख रुपये गमावले. याच गेम मधून जिंकलेले पैसे परत मिळतील म्हणून त्याने ऑनलाइन संपर्क सुरू केला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही जिंकलेली रक्कम मिळत नसल्याने परमेश्वरचे डोळे उघडले आणि आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. 

झटपट पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाइन गेमच्या नादात आपली कष्टाची कमाई गेली हे लक्षात आल्यावर त्याने पोलीस स्टेशन गाठलं. त्याला आता सायबर पोलिसात तक्रार द्यायला सांगितली असून, सोमवारी बँक डिटेल्ससह त्याला सायबर पोलिसांनी तक्रार देण्यास सांगितलं आहे.

परमेश्वर केंद्र गेल्या दोन वर्षापासून या ऑनलाइन गेमच्या नादात अक्षरशः वेडा झाला. मात्र त्याला भानावर यायला दोन वर्षे लागली. मात्र, तोवर त्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं. आज त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एका लहानशा टपरीच्या आधारे चालवावा लागत आहे. परमेश्वरला त्याच्या झालेल्या फसवणुकीतून गमावलेला पैसा त्याला परत मिळेल का हा एक प्रश्नच आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Marathwada Tour: ठाकरेंचा मराठवाड्यात 4 दिवस दगाबाजरे संवाद दौरा Special Report
Beed Special Report आष्टी मतदारसंघात लक्ष घालणार, Pankaja Munde यांची घोषणा, मुंडे वि. धस वाद पेटला
Maharashtra Politics : निवडणुकांची लगबग; कुठे तारखांचा अंदाज, कुठे गाऱ्हाणं Special Report
Maharashtra : सत्याचा मोर्चानंतर गुन्हे दाखल करण्यावरुन राजकीय नाट्याचा दुसरा अंक Special Report
Voter List Row: 'वोट चोरी'च्या आरोपांवरून Thackeray-BJP आमनेसामने, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget