एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : भाजपत रंगीबेरंगी माणसं भरून पुरती वाट लावली; मनोज जरागेंची देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका

अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केल्यास मी बीडमध्ये कलेक्टर, एसपी कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेन, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

अंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील बीडमधील आंदोलकांवर खुनाचे गुन्हे दाखल करणार असल्याचे समजताच चांगलेच संतप्त झाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक काड्या करणारे असल्याचे म्हणत अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. भाजपमध्ये रंगीबेरंगी माणसं उभी करून पुरती वाट लावल्याची सडकून टीकाही त्यांनी केली. 

भाजपत रंगीबेरंगी माणसं भरून पुरती वाट लावली

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केल्यास मी बीडमध्ये कलेक्टर, एसपी कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेन. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकदा झालं आहे, आता पुढे सहन करणार नाही.

ते पुढे म्हणाले की, केजमधील लोकांना उचलण्याची गरज नव्हती, ते आंदोलन करत होते. बीडचे एसपी जातीयवादी आहेत. तुम्ही तुमच्या लोकांना तंबी द्या. बीडसह महराष्ट्रातील लोकांना त्रास देऊ नका. अधिवेशन बोलवा असे मुख्यमंत्री यांना स्पष्ट सांगितले होते. जेवढ्या नोंदी तेवढेच प्रमाणापत्र जमणार नाही, मग तुमचं आमचं जमणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

देवेंद्र फडणवीस थेट टार्गेट 

त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं? घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपत आहे.आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खाल्ले,क रा काय करायचे ते करा, तुम्ही किती ताकतवर आहे, किती 307 करायचे ते करा? असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले. वातावरण जाणून बुजून खराब करू नका, उद्यापासून मी पाणी सोडणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलवली आहे. मग आज काय दिवसभर काय करत होते? नुसती बैठक झाली म्हणता, तुम्हाला आज रात्र आणि उद्या दिवस तुमच्याकडे आहे. जाती एकमेकांच्या अंगावर घालू नका, असे ते म्हणाले. 

राज ठाकरेंच्या पत्राचा आदर, पण..

राज ठाकरे यांनी सरकार असंवेदनशील असून उपोषण सोडा, असे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा आदर आहे. मात्र, हे भंपक असू की कसेही पण सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही. अंगावर आल्यावर सोडणार नाही, याला सरकार जबाबदार, एक उपमुख्यमंत्री याला खास करून जबाबदार असेल. आम्ही 50 टक्के आहोत, बौद्ध, मुस्लिम ,धनगर, ओबीसींचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्हाला अर्धवट निर्णय मान्य नाही, उद्यापर्यत निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.  त्यांनी ओबीसी नेते खाता तर खातात, धमक्या देऊन गोरंगरीबांच्या मराठ्याची पोरं मारायची का? फुकट ते फुकट खायचं आणि धमक्या द्यायच्या? 37 टक्के लोकसंखेला 30 टक्के आरक्षण असतं का? कोण कोण आंदोलन करतो ते पाहून घेऊ, आमच्या मराठ्यांची गरज नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget