Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक अधिक जबाबदार; एकाला काड्या करण्याची जास्त सवय; जरांगे पाटलांचा निशाणा नेमका कोणावर?
अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी, बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये कलेक्टर SP कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेन, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. किती दिवसात मराठा आरक्षण देणार ते सांगा, त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच जरांगे पाटील यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक अधिक जबाबदार राहतील. एकाला काड्या करण्याची जास्त सवय असल्याची घणाघाती टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे आता जरांगे पाटलांचा रोख नेमका कोणावर? अशी चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसा करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला आहे. गुन्हा दाखल केल्यास स्वत: बीडला जाणार असल्याचा इशारा दिला.
भाजप तुमच्यामुळेच संपायला आलं
त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं? घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपायला आलं, आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खाता, करा काय करायचे ते करा, तुम्ही किती ताकतवर आहे? 307 करायचे ते करा? असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. तर मी बीडमध्ये कलेक्टर, SP कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेल.
जरांगे पाटील म्हणाले की, अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी, बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये कलेक्टर SP कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेन. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकदा झाल्यास पुढे सहन करणार नाही. केजमधील लोकांना उचलण्याची गरज नव्हती, ते आंदोलन करत होते, शहाणे व्हा.
इतर महत्वाच्या बातम्या