'शिव्या महाराष्ट्राची संस्कृती नाही'; 'त्या' तथाकथित ऑडिओ क्लिपवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया
Rajesh Tope : “राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील,” असे टोपे म्हणाले आहेत.
जालना : जिल्ह्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) समाज माध्यमामध्ये व्हायरल होत आहे. ज्यात, लोणीकर आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर आता राजेश टोपे यांची प्रतिक्रिया आली आहे. “राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील,” असे टोपे म्हणाले आहेत.
व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत राजेश टोपे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील. राजकीय जीवनातील संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत, असे टोपे म्हणाले.
महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे.आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत.राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे शिव्यांची नाही.खालच्या पातळीचे राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील.राजकीय जीवनातील संस्कृती,मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 14, 2023
राजेश टोपे यांची 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया
दरम्यान, राजेश टोपे यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,"व्हायरल फोनबाबत मी प्रतिक्रिया देणार नाही. शिव्या देणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी लोणीकर यांना बँकेतील उपाध्यक्ष पदासाठी शब्द दिला नाही. मी शब्द रावसाहेब दानवे यांना दिला होता. त्यामुळं माझ्यासाठी हा विषय संपला आहे.” असे टोपे म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार राजेश टोपे यांच्या संभाषणाची तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर याना उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद पाहायला मिळतोय. राहुल यांना उपाध्यक्ष करण्याचं ठरल्यानंतर देखील तसे झाला नसल्याचा राग अनावर झाल्याने लोणीकर यांनी टोपे यांना शिवीगाळ केल्याचा बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गेल्या आठवड्यात याच मुद्यावरून राजेश टोपे यांच्या गाडीवर तर बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक झाली होती. तर, पोलिसांत या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
राजेश टोपे दिल्लीत
दरम्यान, राज्यातील इथेनॉल आणि कांदा प्रश्ननी तोडगा काढावा यासाठी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता. याच बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांची
इतर महत्वाच्या बातम्या:
अरे चोर कुत्रा, तुझं टक्कल फोडतो, राजेश टोपे-बबनराव लोणीकरांची ऑडिओ क्लिप