Kurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ
Kurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ
कुर्ला बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर...अपघातानंतर प्रवाशांनी मारल्या उड्या...तर बसचालकानं क्लचऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्यानं अपघात झाल्याचं समोर...
क्लच समजून एक्सिलरेटरवर पाय दिल्याने अपघात?
कुर्ला बस अपघात प्रकरणात आरोपी संजय मोरे याला क्लज समजून चुकून बसच्या एक्सिलेटरवरच दिला पाय
संजयला अवजड वाहने चालवण्याचा अनुभव नव्हता, यापूर्वी संजय मिनी बस चालवायचा
या बसेसला क्लच ब्रेक आणि एक्सिलेटर होते. अशातच १० दिवसाच्या प्रशिक्षणानंतर संजयच्या हातात थेट मोठी बस देण्यात आली
अपघात झाला त्यावेळी त्याने ‘क्लच’ समजून चुकून ‘अॅक्सिलरेटर’वर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला
अपघात झालेल्या रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता, नियंत्रणात नसलेली बस थांबवण्यासाठी संजयने पुढे जाऊन सुरक्षा भिंतीला बस ठोकली
संजयच्या चौकशीत त्यावेळी नेमकं काय झालं हे कळालचं नाही असे उत्तर मिळाल्याची पोलिस सुत्रांची माहिती