Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंना अंतरवाली सराटीत आणून दाखवलं, उपोषण सोडतानाच जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा
Manoj Jarange Patil Speech : मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. यानंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
जालना : "एकनाथ शिंदे साहेबच मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकतात. मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि शिंदे साहेबांना हटू देणार नाही," असा निर्धार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी आपलं उपोषण (Hunger Strike) मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. यानंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत.
- शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केलं.
- आपण जनआक्रोश आंदोलन असं नाव या आंदोलनाला दिले. आरक्षण तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
- मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांची आशा आहे.
- मी भारावून न जाता ,आरक्षण प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
- माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी 10 दिवस वाढवून देतो.
- जीव गेला तरी तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षण टाकेल. शिंदे साहेब येणार म्हटले, आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.
सतराव्या दिवशी उपोषण मागे
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सतराव्या दिवशी मागे घेतलं. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील उपस्थिती होते.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे.
VIDEO : Manoj Jarange Speech Jalna : उपोषण सोडतानाचा मनोज जरांगे यांचा प्रत्येक शब्द, जसाच्या तसा!
हेही वाचा