एक्स्प्लोर

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार

Maratha Reservation : मराठा समाज अडचणीत आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. 

जालना : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असून 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं. मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकाही केली. अंतरवाली सराटी येथे त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केला असून जरांगे यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं दिसून आलं. 

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मधून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.

देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी

मनोज जरांगे यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांचे 113 आमदार पाडणार असं जरांगे म्हणाले. भाजपमधील सगळे मिळून फडणवीसांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असं त्यांचे लोक आपल्याजवळ येऊन बोलतात असं जरांगेंनी म्हटलंय. 

फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटतात असा दावा मनोज जरांगे यांनी केला. भुजबळांपेक्षाही अधिक जातीयवाद हा फडणवीसांनी पसरवला अशी टीका मनोज जरांगेंनी केली. 

रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. माझ्या नादी लागू नका, मी बिघडलो तर सगळं साफ करुन टाकेन, तुम्हाला ग्रामपंचायत सदस्यसुद्धा होऊ देणार नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल केला. 

काहीही झाले तरी उपोषण होणारच

मनोज जरांगे म्हणाले की, मी समाजाला शब्द दिला होता मी आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही. पुन्हा एकदा सहा कोटी मराठा एकत्र आणणार. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी माझी. जीवनात आल्यानंतर कधी ना कधी मरण आहेच. माझा समाज अडचणीत आहे. त्यामुळे 29 सप्टेंबरला उपोषण होणारच. तुम्ही मला इथे बसू दिलं नाही तर दवाखान्यात जाऊन मी उपोषण करणार. मुंबईला जाऊ, सरकारही पाडू, पण उपोषण करणारच.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Minister Bungalow : महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासनCyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूटDevendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
Embed widget