एक्स्प्लोर

Manoj Jarange : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, मनोज जरांगेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले....

Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. 

जालना : मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार असून यावेळी त्यांनी सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजता सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावल्याच्या गोष्टीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याला मंत्रिमंडळात का घेतलं नाही याच्याशी आमचं काही देणं-घेणं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. छगन भुजबळांवर एका वाक्यात प्रतिक्रिया देत मनोज जरांगे यांनी तो विषय टाळला. 

... तर उपोषणाला एकटा बसणार

रविवारी नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंगळवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार असल्याचं  सांगितलं. ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसून सामूहिक आमरण उपोषणाला जरी कोणी नाही बसलं, तरी आपण बसणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. 

सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील जरांगे यांनी केली.

जरांगेंना अंगावर घेतलं म्हणून मंत्रिपद नाकारलं

जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं गेलं असा आरोप करत छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.  मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही असंही छगन भुजबळ म्हणाले. मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. असं सांगत आपण अजित पवारांशी चर्चा केली नसल्याचं भुजबळ म्हणाले.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगेAjit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Embed widget