Manoj Jarange Patil LIVE Updates: मराठ्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, भुजबळांवर जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil Sabha LIVE Updates: आज जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाचा एल्गार, सभास्थळी मोठी गर्दी, 10 दिवसांत आरक्षण द्या, जरांगेंची एबीपी माझाला माहिती मिळाली आहे.
LIVE
Background
Manoj Jarange Patil Sabha LIVE Updates: मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil Sabha) आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (jalna antarwali ) गावात सभा झाली. दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात झाली. त्याआधीच सभास्थळी मोठी गर्दी झाली . काल रात्रीपासूनच मैदानात लोक जमले आहेत. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आलेत. सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी जवळपास १०० एकर जागा तयार करण्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. दरम्यान आंतरवाली सराटी गावातील सभेमुळे अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर 100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं.
रात्रीपासूनच सभेसाठी गर्दी
मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. त्यासाठी आज रात्रीपासूनच तिथं गर्दी झाली आहे. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आदल्या दिवशीच आले आहेत. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. आजच्या सभेसाठी होणार अलोट गर्दी लक्षात घेत, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालन्यात आज शाळा बंद
जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला.
जरांगेंची सभा 100 एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी 80 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये 110 रुग्णवाहिका, त्यात 35 कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच 40 बेडस, 300 डॉक्टर, 300 नर्सिंग स्टाफ असेल. 12000 लिटरचे 50 पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. 5 लाख पाणी बॉटल्स, 1000 लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil Facebook Block : माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं - मनोज जरांगे पाटील
माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Speech : उद्रेक, जाळपोळ करु नका, आरक्षण यांच्या छाताडावर बसून घेऊ
उद्रेक, जाळपोळ करु नका, आरक्षण यांच्या छाताडावर बसून घेऊ, गाफील राहू नका. लोक आपल्याला उचकवतील. उद्रेक करु नका, शांततेनं आंदोलन करा - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil LIVE Updates: आपल्याच फूट पाडण्याचा प्रयत्न होईल - मनोज जरांगे पाटील
आपल्याच फूट पाडण्याचा प्रयत्न होईल - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil LIVE Speech : मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही - मनोज जरांगे पाटील
मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. आता जमिनीचा, पुराव्याचा घाट घालू नका. मिळालेल्या पुराव्याचा आधार घेऊन आरक्षण द्या - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Ultimatum : एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल
Manoj Jarange Patil Ultimatum : ''24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर मी टोकाचं उपोषण करणार, मग एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल.''