एक्स्प्लोर

Maratha Reservation : आरक्षणासाठी दोन महिन्यांचा वेळ, नंतर मुंबई जाम करणार, आर्थिक नाड्या आवळणार; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळला नाही तर चार कोटी मराठ्यांना घेऊन मुंबईत जाणार आणि मुंबई बंद करणार असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

जालना: मराठा आरक्षणासाठी  (Maratha Reservation Protest) ही शेवटची वेळ असेल, दोन महिन्यांचा वेळ दिला, या काळात सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नाही दिल्यास यांच्या नाड्या आवळणार, मुंबई जाम करणार असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, फक्त आमरण उपोषण बंद राहिल असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी भेटायला आलेल्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. 

फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना नाही तर राज्यातल्या सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं, त्यासाठी ही शेवटची वेळ असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आतापर्यंत आमच्या समाजाची फसवणूक केली आहे, आता फसवणूक करण्याची ही शेवटची असेल असं ते म्हणाले. 

मुंबईच्या नाड्या आवळणार

राज्य सरकारने जर दोन महिन्यात आरक्षण दिलं नाही तर मुंबईच्या नाड्या आवळणार असा इशारा जरांगे यांनी दिला. ते म्हणाले की, काही दगाफटका केला तर मुंबई बंद करणार. कोणत्याच मुद्द्यावर माझं समाधान झालं नाही. तरीही आता सरकारला 55 दिवस दिले आहे. जर सरकारने शब्द पाळला नाही तर यांचे नाक दाबणार. मुंबई जाम करणार आणि राज्य सरकारच्या आर्थिक, औद्यागिक नाड्या आवळणार. चार कोटी मराठ्यांना घेऊन मुंबईत जाणार. मराठे नुसता मुंबईच्या सीमेवर उभे राहिले तरी मुंबईला काही खायला मिळणार नाही. 

राज्याचा दौरा करणार

मधल्या काळात राज्यभर दौरा करून मराठ्यांमध्ये एकत्र येण्यासाठी जागृती करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. दोन महिन्यानंतर जर मुंबईमध्ये मोठं आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी नियोजन केलं पाहिजे, त्याची तयारी करणार असं जरांगे म्हणाले. 

दोन महिन्यात शेतीची कामं उरकून घ्या

सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर या काळात कापूस, ऊस आणि इतर शेतीची कामं उरकून घ्या, दिवाळीचा सण गोड करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. त्यानंतर आपल्याला मुंबईला धडक द्यायची आहे असंही ते म्हणाले. 

राजकीय नेत्यांना आता गावात घ्या

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावातल्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती. ती आता उठवा आणि नेत्यांना गावात घ्या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. वेळ आला की यांचाही कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला. 

सरसरट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या

फक्त मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मतावर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. पारंपरिक परिवार, रक्ताचे नातेवाईक आणि सगेसोयरिक यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावं असंही ते म्हणाले. तसेच जो मागेल त्या गरजवंताला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आपण मागणी केली असल्याचं ते म्हणाले. 

राज्यात नोकरभरती घ्यायची तर आमच्या टक्केवारीनुसार जागा सोडायचं आणि मगच नोकरभरती करायचं ही आपली मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केल्याचं मनोज जरांगे म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget