एक्स्प्लोर

धक्कादायक! दारूमध्ये विषारी औषध पाजून एकास ठार मारण्याचा प्रयत्न; जालना जिल्ह्यातील घटना

Jalna Crime News : याप्रकरणी तीन जणांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील (Jalna District) घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे.  दारूमध्ये विषारी औषध (Poisonous Drug) पाजून एकास ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  मात्र वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात (Ghansawangi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर देवीदास पवार असे विषारी औषध पाजण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धूलिवंदनाच्या दिवशी दारूसोबत विषारी द्रव्य वाजून एकास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवनगर तांडा येथे मंगळवारी रंगोत्सव साजरा करून नृत्य करुन रात्री ज्ञानेश्वर देवीदास पवार हे पत्नी व मुलासह घरी झोपले होते. दरम्यान यावेळी गावातील त्यांच्या घराशेजारी राहणारे अर्जुन उत्तम पवार, सुधाकर अर्जुन पवार, राजू अर्जुन पवार आले. त्यांनी कृष्णा भीमराव पवार याच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आमच्यासोबत नृत्यासाठी चल असे सांगितले. 

दारू पिल्यावर उलटी चक्कर येऊ लागली...

दरम्यान त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर जात असताना रस्त्यामध्ये मच्छिंद्र तुकाराम पवार याला सोबत घेतले. कृष्णा पवारच्या घरासमोर नृत्य करीत असताना त्याने नकळत मच्छिंद्र पवार यांच्या ग्लासामध्ये दारूसह काहीतरी विषारी द्रव्य टाकून पिण्यास दिले. अर्जुन उत्तम पवार, मच्छिंद्र तुकाराम पवार यांनी पिण्यासाठी आग्रह केला. ते पिल्यानंतर काही वेळेत उलटी चक्कर आल्याने मच्छिंद्र पवार घरी गेले. 

प्रकृती खालावण्याने रुग्णालयात दाखल...

घरी गेल्यावर मच्छिंद्र पवार यांची प्रकृती खालावण्याने त्यांच्या पत्नी कविता, आई यमुनाबाई, वडील देविदास, कैलास पवार यांनी त्यांना घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालयात औषध उपचार करून पुढे सामान्य रुग्णालय जालना येथे व तेथून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात औषध उपचार केला. अशा आशयाच्या शुक्रवारी ज्ञानेश्वर देवीदास पवार यांनी पोलिस ठाणे घनसावंगी येथे तक्रार दिली. त्यावरून कृष्णा भीमराव पवार, अर्जुन उत्तम पवार, मच्छिंद्र तुकाराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ हे करीत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Jalna News: व्याजासाठी सावकाराचा तगादा, मारहाणही केली; जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHAArvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget