एक्स्प्लोर

जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?

विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत 6 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली

Jalna Muncipal Corporation Elelction: जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक 10 मधील मिलन चौक परिसरात विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत 6 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजय उमेदवाराच्या मिरवणुकीत राडा

मिळालेल्या माहितीनुसार , काँग्रेसच्या विजयी उमेदवार अन्सारी फरहाना अब्दुल रऊफ यांच्या समर्थकांनी विजयाच्या आनंदात मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मिलन चौकात पोहोचताच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही गटांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी सुरू झाली.

या गोंधळात दोन्ही बाजूंचे मिळून सहा ते जण गंभीररीत्या जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार," काल (16 जानेवारी) साडेपाच वाजेच्या सुमारास मिलन चौकामध्ये दोन गटांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.

65 जागा 454 उमेदवार.. 

महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत 16 प्रभाग 65 जागा आणि 454 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.  जालना शहरात 291 केंद्रांवर गुरुवारी (15 जानेवारी 2026) मतदान प्रक्रिया पार पडली. युतीचे प्रस्ताव फिस्कटले. बैठकांचा सिलसिला थांबला. पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडू नये यासाठी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते मात्र, जालना महानगरपालिकेत (Jalna municipal corporation election) भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचा जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे बदलली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget