एक्स्प्लोर

राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवलं, भुजबळांचा तुफान हल्ला, जालना लाठीचार्जवरुन गंभीर आरोप

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : "कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?" असं म्हणते  भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला.

अंबड, जालना : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर तुफान हल्ला केला. "कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?" असं म्हणते  भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले.  जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते. 

यावेळी छगन भुजबळांनी जालन्यातील लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केले. मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी 70 पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं.  होममिनिस्टरच माफी मागू लागला,गुन्हे मागे घेऊ म्हणू लागला, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं, असं भुजबळ म्हणाले. तसंच ओबीसींचे बोर्ड फाडणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा आदेश भुजबळांनी दिला.

टोपे-रोहित पवारांनी जरांगेंना आणून बसवलं 

लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला (जरांगे) पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.  त्याला सांगितलं, शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असं भुजबळ म्हणाले. 

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन यांनी मतांनी मी त्यांना आदरपूर्वक आदरांजली वाहतो-- भुजबळांकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

आज एक महत्त्वाचा नेता या ठिकाणी नाही तो नेता म्हणजे माननीय गोपीनाथ मुंडे

आज गोपीनाथराव मुंडे असते तर संकटा मागून संकट आमच्यावर आले नसते. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेली ओबीसी ची दीक्षा घेऊन पुढे जाऊ
मंडळ आयोग लागू करण्याची मागणी केली गेली,

शरद पवार साहेबांबद्दल मी एवढेच सांगेल आयोग व्हीपी सिंग साहेब पंतप्रधान त्यांनी तो स्वीकारला आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिले पाहिजे हा निर्णय घेतला..

याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पवार साहेबांना विनंती केली आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कोणाला आरक्षण द्यायची मुभाच नव्हती

मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे

मंडळ आयोगाने आरक्षण दिले त्यावेळी सुद्या कोर्टात गेली त्यावेळी कोर्टाने सात न्यायमूर्तीच्या खंडपीठांसमोर न्यायालयाने ओबीसींना आरक्षण दिले पाहिजेब याला स्वीकृती दिली

कोणाचं खाता कोणाचं खाता?? तुझे खातो काय रे ??जरांगेंना भुजबळांचा टोला

आमची लेकरबाळ म्हणतो--आमची नाही का

छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो,हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही जरांगेंना भुजबळांचा जोरदार टोला

आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या 

मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही 

तीन लाख 80 हजार विद्यार्थ्यांना 1300 कोटी रुपये वाचण्यात आले

सारथी मार्फत 172 कोटी वाटले

आताही मराठा समाजाला 300 कोटी मंजूर झाले

मराठा विद्यार्थ्यांना जे मिळत ते obc विद्यार्थ्यांना अजूनही मिळत नाही 

पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला पण 70 महिला पोलीस अॅडमिट झाले,ते कोणी पाहिले नाही

त्यावेळी जरांगे यांनी सर्व तयारी केली होती,

70 पोलीस काय पाय घसरून पडले का?त्यांना कोणी मारले

रुपाली चाकणकर,नीलम ताई महिला पोलिसांच्या घरी जा----

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं मात्र त्यांनी महिला पोलिसांवर दगडफेक केली

लाठी चार्ज झाल्यागर हे सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन बसले

आमचे टोपे साहेब, आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला(जरांगे) पहाटे तीन वाजता परत आणून बसवले. 

त्याला सांगितलं, शरद पवारसाहेब येणार आहेत

SP ची चूक आहे त्याने बोलायला हवे होते माझे पोलीस रस्त्यावर पोहचले होते

राज्यापुढे खरं चित्र आले नाही

होम मिनिस्टरच माफी मागू लागला,गुन्हे मागे घेऊ म्हणू लागला, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं

बीडमध्ये ,प्रकाश सोळुंकेचे घर जाळले

कोड नंबर दिले होते-1 नंबर प्रकाश सोळुंके 12 नंबर राऊत हॉटेल असे नंबर दिले 

हॉटेल 12-15km वर होत त्याचा काय दोष होता, obc होता

राखरांगोळी शब्द म्हणजे काय मी त्या दिवशी बीडमध्ये पाहिले

संदीप क्षीरसागर यांचे घर जाळले, त्यानंतर राऊतचे हॉटेल जाळले 

जयदत्त क्षीरसागर, संदीप सागर यांच्या घरात पेट्रोल बाँब टाकले, त्यांची लेकरं बाळ पण घरात होती

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दुसऱ्यांची  घरं जाळायलाच  सांगितलं? 

त्या नवीन नेत्याला सांगायला तीन न्यायमूर्ती गेले.  

आमक्या आमक्या आश्रमाचे महाराज आले म्हणून मी पाणी पितो, आता पाणी पिणार नाही 

न्यायमूर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का?

याद राख माझ्या शेपटावर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस--भुजबळ

जनगणना ताबडतोब झाली पाहिजे

हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत 

निजामशाही मध्ये जे पुरावे सापडले त्यांना  द्यायची की नाही हे विचारण्यात आलं

11 चे 12 झाले दुसऱ्या दिवशी 13 साडेतेरा झाले

आमच्या obc ना प्रमाणपत्र 8 -8-10-10 वर्ष लागतात, त्यांना मराठा पुढं कुणबी पेनाने लिहून देऊन प्रमाणपत्र दिले जातेय


पंतप्रधान obc नेते आहेत म्हणत आहेत, पण इकडे महाराष्ट्रात ओबीसींचे शिरकाण होत आहे तिकडे लक्ष द्या

महाडा तालुक्यात  गावात मतदान केले नाही म्हणून 

पंढरपूर एकाला फाशी दिली, ती आत्महत्या भासवली,पोलिसांनी कारवाई केली नाही

पुढार्‍यांना गावबंदी,महाराष्ट्र काय तुमच्या सातबारावर लिहून दिला काय रे

गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, सरकार आहे की नाही, कायद्याचे राज्य आहे की नाही??,

तुम्ही दादागिरी थांबवली नाही तर obc बरोबर ,मुस्लिम।दलित एकत्र आल्यावर बघा

मी दोन महिने सहन करतोय, कोणाचा द्वेष केला नाही मी।मराठा समाजाचा द्वेष केला नाही 35 वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केलं आज अजित पवार सोबत आहे

पंढरपूर ला अजित पवार यायचं नाही?? देव पण।तुझा झाला का रे

पंढरपूर चा पांडुरंग कृष्णाचा आवतार तो यादव कुळातला म्हणजे तो ओबीसीच

26 नोव्हेंबर ला ओबीसी एल्गार सभा

संबंधित बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Embed widget