एक्स्प्लोर

Arjun Khotkar : अर्जुन खोतकर हाजिर हो! मनी लाँड्रिंग प्रकरणी शिंदे गटाच्या खोतकरांना PMLA कोर्टाचा आदेश, अडचणीत वाढ होणार

Arjun Khotkar ED Case : जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉड्रिंग (Money Laundring) प्रकरणात विशेष PMLA कोर्टानं अर्जुन खोतकरांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde group) आणि माजी आमदार अर्जुन खोतकरांच्या (Arjun Khotkar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉड्रिंग (Money Laundring) प्रकरणात विशेष PMLA कोर्टानं अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापाडिया यांना 12 जानेवारी 2024 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. 

जालना साखर कारखान्याची निर्मिती 1984 साली झाली होती. तत्कालीन राज्य सरकारनं या साखर कारखान्यासाठी तब्बल 100 एकर जमीन विनामूल्य दिली होती. आता जवळपास 9 हजार भागधारक शेतकरी असलेला हा कारखाना तोट्यात आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्जही थकीत झालं. 

दरम्यान, थकीत कर्ज चुकवण्यासाठी खोतकरांनी पुन्हा कर्ज घेतलं, पण घेतलेलं कर्जही थकीत झालं. अनेक अनावश्यक अर्थिक व्यवहार करून अर्जुन खोतकरांनी मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं कोर्टानं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे खोतकरांना हजर राहण्याचा आदेश देण्यात आला. 

अर्जुन खोतकर शिंदे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटापासून वेगळी चूल मांडल्यानंतर शिवसेनेतील बहुतांश आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या गटात केले. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर ईडीची कारवाईमध्ये काही प्रमाणात संथता आली होती. त्यामुळे शिंदे गटात गेल्यानंतर अर्जुन खोतकर सुटले अशी चर्चा सुरू होती. पण अर्जुन खोतकरांच्या मागचा ससेमिरा अद्याप 

काय आहे प्रकरण? 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. सोमय्यां यांच्या आरोपांनंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक अर्जुन खोतकर यांच्या घरी दाखल झालं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास कसून चौकशी केली होती. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली.

या व्यवहारात सहभागी असलेल्या औरंगाबादमधील दोन व्यापाऱ्यांचा कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर कारखाना मे.अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीच्या वेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला.

थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना अवघ्या 42 कोटी 31 लाख रुपयांना विकण्यात आला.  मात्र त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यानंतर या प्रकरणात ईडीकडून अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget