एक्स्प्लोर

Jalgaon News : जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का, खंदा शिलेदार भाजपात, गिरीश महाजनांना असलेला विरोध मावळला

Jalgaon : गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात राजकारण करणारा नेता भाजपात सहभागी होणार आहे.

Jalgaon News :  आगामी निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar Group) धक्का बसला आहे. मागील 35 वर्षांपासून विद्यमान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपात दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड (Sanjay Garud) यांनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले असून राजकीय समीकरणेही काही प्रमाणात बदलणार आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढत आले आहेत. त्यांनी महाजनांविरोधात चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नाही. त्यात गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पक्षातूनच कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जावे लागत होते. त्याशिवाय, विरोधी बाकांवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्याची कामे होत नसल्याने संजय गरूड त्रस्त होते. अशातच अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या मिरवणुकीत काही वेळेसाठी सहभागी झालेल्या संजय गरुड यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये येण्याचा सल्ला दिला.मंत्री गिरीश महाजन यांच्या सल्ल्यानंतरचा मागचा पुढचा विचार न करता संजय गरुड यांनी आपल्या  राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मुंबई होणार पक्षप्रवेश 

संजय गरूड यांचा मंगळवारी मुंबईत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.  संजय गरूड यांच्या भाजपा प्रवेशानंतर मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या जामनेर मतदार संघात  ताकद अजून वाढणार  आहे. राजकीय क्षेत्रात भक्कम विरोधी नेता राहिला नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले उल्हास पाटील लेकीसह भाजपामध्ये 

 काँग्रेस (Congress)  पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी  कन्या डॉ. केतकी पाटीलसह (Ketaki Patil) भाजपामध्ये (BJP)  प्रवेश करणार आहे. डॉ. उल्हास पाटील हे 1998 साली काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. मात्र केवळ तेरा महिन्याचा काळ त्यांना मिळाला होता.एके काळी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हयात काँग्रेस पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ.  उल्हास पाटील यांनी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसचे माजी खासदार डॉ.  उल्हास पाटील हे काँग्रेसमध्ये राहिले असेल तरी  यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेसमध्ये कधीच दिसल्या नव्हत्या.  त्या भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा माध्यमातून येऊ लागल्याने काँग्रेस पक्षातून डॉ. उल्हास पाटील यांना अचानक निलंबित करण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bengaluru Engineering College Hidden Camera : इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
Vanraj Andekar murder: दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
Manoj Jarange: वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हाAnandache Paan : लेखक देवदत्त पट्टनायक यांच्याशी 'द स्टोरीज बी टेल' निमित्त गप्पाSatyapal Malik Meet Uddhav Thackeray : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणारWorli Vidhansabha :  राज ठाकरेंकडून कौतुक, आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून संदीप देशपांडे उमेदवार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bengaluru Engineering College Hidden Camera : इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले
Vanraj Andekar murder: दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
Manoj Jarange: वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती निवळली; जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,जालन्यासह 'या' जिल्ह्यात बंदची हाक
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त
FDA Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या
अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या
Dushyant Chautala : 'त्यावेळी भाजपसोबत राहणं, माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
'ती माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Embed widget