Rohini Khadse : 'सुप्रिया सुळेंवर टीका म्हणजे आकाशाकडे थुंकण्यासारखे'; रोहिणी खडसेंचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर
Rupali Chakankar vs Rohini Khadse : सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती. यावरून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
![Rohini Khadse : 'सुप्रिया सुळेंवर टीका म्हणजे आकाशाकडे थुंकण्यासारखे'; रोहिणी खडसेंचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर Rohini Khadse s reaction to Rupali Chakankar s criticism of Supriya Sule Maharashtra Politics Marathi News Rohini Khadse : 'सुप्रिया सुळेंवर टीका म्हणजे आकाशाकडे थुंकण्यासारखे'; रोहिणी खडसेंचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/02/2831f6bd13a6fb8b264d346fc89f36331722580690968923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका देखील केली होती. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली होती. या पाठोपाठ रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आता रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केलाय.
रुपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे
रुपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. सुप्रिया सुळेंवर टीका करणे म्हणजेच आकाशाकडे थुंकण्यासारखे आहे. त्यामुळे पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा आणि मगच नेत्यांवर टीका करा, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांना दिले आहे.
काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?
उरणच्या पिडीतेवर चक्कार एकही शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांवर अनेक विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करत असतात. तर लोकसभेत त्यांचा सेट केलेला नरेटिव्ह आता धूऊन निघाला आहे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. इतकंच नाहीतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशा पद्धतीचे विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर केली होती.
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना तडीपार करा : हेमा पिंपळे
महाराष्ट्रात चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बद्दल गरळ ओकण्याचे काम ते करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांचा आकांडतांडव करत आहे, ते पाहून असं वाटतं की, त्यांना कुठली तरी सापशिडी वापरुन राजकारणात काही कमावायचं आहे. त्यामुळे, या दोघी असंस्कृत, असभ्य महिलांना महाराष्ट्रातून तडीपार करावं अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी केली.
आणखी वाचा
तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू; रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंवर पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)