Raksha Khadse : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
Raksha Khadse : मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच रक्षा खडसे रावेर मतदारसंघात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र येणार का? याबाबत महत्वाचे भाष्य केले.
Raksha Khadse जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) भाजपच्या तीन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांच्यावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच रक्षा खडसे रावेर मतदारसंघात दाखल झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत आणि गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्या वादाबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊ हे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
दोघांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार
एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन (Girish Mahajan) एकत्र येणार का? असे विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टीसोबत जेवढे लोक जोडतील. तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजपमधील खूप जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.
आरोप-प्रत्यारोप थांबवून दोघांनी एकत्र आले पाहिजे
गेल्या चार-पाच वर्षांपासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे. परंतु माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे की, दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागील काळामध्ये जेव्हा हे दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. मात्र मागील काळात काही नाथाभाऊंच्या आणि काही गिरीश भाऊंच्या ज्या चुका झालेल्या आहेत. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप त्यांनी केले आहेत. आता चांगली संधी आहे हे आरोप-प्रत्यारोप थांबवून दोघांनी एकत्र आले पाहिजे. कारण गिरीश भाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचा खूप चांगला विकास होईल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
"तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमीच राहील", रक्षा खडसेंसाठी प्रीतम मुंडेंची खास पोस्ट