एक्स्प्लोर

"तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमीच राहील", रक्षा खडसेंसाठी प्रीतम मुंडेंची खास पोस्ट

Khasdar Raksha Khadse : बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे.

Pritam Munde on Khasdar Raksha Khadse : बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावेरमधून रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळाले. मागील 10 वर्षांमध्ये संसदेत रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे एकत्रच होत्या. त्यावेळी त्यांची मैत्री घट्ट झाली होती. केंद्रात मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही रक्षा खडसे यांनी प्रीतम मुंडे यांची आठवण काढली होती. आता प्रीतम मुंडे यांनीही रक्षा खडसे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.  

केंद्रामध्ये नव्याने मंत्री झालेल्या रक्षा खडसे यांनी मुलाखत देताना जिवलग मैत्रीण प्रीतम मुंडे यांची आठवण काढून भावनिक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. प्रीतम मुंडे यांची आठवण काढून रक्षा खडसे यांना गहिवरून आले, आता डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी रक्षा खडसे यांच्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे, असे प्रीतम मुंडे यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलेय. 

प्रीतम मुंडे यांची नेमकी पोस्ट  काय आहे  ? 

10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. 10 वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!

10 वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

पाहा प्रीतम मुंडेंची इन्स्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Dr Pritam Gopinath Munde (@drpritam_gopinath_munde)

आणखी वाचा 

Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 28 September 2024Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहितीRajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Embed widget