एक्स्प्लोर

Jalgaon Police : पोलिसांचा झिंगाट डान्स अन् एकमेकांवर पैशांची ओवाळणी; जळगावच्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल 

Jalgaon Police : जळगाव पोलिसांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jalgaon Police : जळगावातील (Jalgaon) एका हॉटेलमधील पोलिसांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळत आहे. याचवेळी एकमेकांवर पैशांची ओवाळणी अन् पोलिसांचा हॉटेलमध्ये झिंगाट डान्स सुरु (Zinggat dance) असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

जळगाव पोलीस (Jalgaon Police) पुन्हा एकदा चर्चेत आले असून आता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीने शहरातील बियर बारमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मद्यप्राशन तसेच जेवण केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी याच हॉटेलात टिमकी वाजवणाऱ्या वादकाला बोलावून घेत टिमकीच्या तालावर नृत्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. नृत्य करणारे हे काही पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे (Jalgaon Taluka Police) कर्मचारी असून तर एक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्यांपैकी एक ते दोन जण हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे खाजगी व्यक्ती असल्याचे समजत आहे. नेमकं कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांने पार्टीचं आयोजन केलं आणि पोलिसांच्या पार्टीचे निमित्त काय? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

दरम्यान, रात्रीच्या वेळी हॉटेलात नृत्य करताना पोलीस कर्मचारी एकमेकांच्या अंगावरून पैशाची ओवाळणी करत वादकाला पैसे देत असल्याचेही या व्हिडीओत दिसून येत आहे. एक ते दोन महिन्यांच्या काळातीलच हा व्हिडीओ (Video Viral) असल्याचं सूत्रांकडून सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये नृत्य करताना दिसून येणाऱ्या  एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विश्वनाथ गायकवाड असून तो तालुका पोलीस स्टेशनचा कर्मचारी असल्याचे समजते आहे. या गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला दोन दिवसांपूर्वीच अवैध वाळू व्यवसायात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नृत्य करतानाचा हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बियरबारमध्ये मद्य प्राशन करून अशा प्रकारचे नृत्य करणे पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असून या कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विधानसभेच्या अधिवेशनात असो की पत्रकार परिषदेत अनेकदा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव पोलिसांवर हप्ते खोरीसह अनेक गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांचा धाकच राहिला नाही, असंही वेळोवेळी एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता पोलिसांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Police Dance : पोलिसांच्या हिरोगिरीला वेसण, सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse: वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Horoscope Today 25 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing :  शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी सकारात्मकAmrut Jyeshtha Nagrik Yojana : योजनेतील तिकीटं चुकीच्या पद्धतीनं देऊ नये; कर्मचाऱ्यांना सूचनाKolhapur Case : कोल्हापुरात महिलेची छेड काढणाऱ्या डाॅक्टरला चोपTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse: वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
वेळेत बोलावलं असतो तर गेलो असतो, पण आता निमंत्रण मिळालं तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही: एकनाथ खडसे
Pune Rain Updates: पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Mega Block :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी,  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
Horoscope Today 25 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
Nepal Bus accident : वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ज्यांनी सांभाळलं ते काकाही गेले; आई, भावासह एकाच कुुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Numerology : अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, चुटकीसरशी सोडवतात सगळे प्रॉब्लेम
अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, चुटकीसरशी सोडवतात सगळे प्रॉब्लेम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांची घोषणा; पुलवामामधून इश्तियाक अहमद घड्याळ चिन्हावर लढणार
Embed widget