Jalgaon Crime : पीडितेच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, संशयिताला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज भडगाव बंद
Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व भडगाव तालुक्यात बंद पाळण्यात आला.
Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व भडगाव तालुका तसेच जिल्हा एकवटला असल्याचा पाहायला मिळत आहे. घटनेतील मुलीला न्याय मिळावा यासह आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काल मूक मोर्चा काढल्यानंतर आज भडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
पीडित आठ वर्षीय मुलीवरील (Girl Murder) अमानुष अत्याचार आणि तिच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. भडगाव (Bhadagoan) तालुक्यातील हे मोठ्या प्रमाणावर घटनेच्या निषेधार्थ काल मूक मोर्चा (Morcha) काढण्यात आल्यानंतर आज कडकडीत बंद पाळण्यात आला. पीडितेच्या अत्याचार व खून प्रकरणी दाखल गुन्ह्याचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, पीडितेच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी भडगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंतची परिस्थिती लक्षात घेतली तर शंभर टक्के हा बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.
दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः फोनवरुन पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यांनतर संशयितास कठोर कारवाई होईल असे आश्वासन देखील यावेळी दिले. यानंतर आज सर्व तालुक्याच्या वतीने भडगाव शहरात बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळपासूनच बंदमध्ये सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्याचबरोबर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. या बंदमध्ये सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचा पाहायला मिळालं. सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा यावेळी एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. दुपारी चार वाजेपर्यंत भडगावात रस्त्यांवर शुकशुकाट होता. तर मेडिकल, दवाखाने यासह अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच बाजारपेठ बंद असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
स्थानिक आमदारांकडून 50 हजारांची मदत
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील माजी आमदार दिलीप वाघ यासह राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसेच यावेळी मंत्री आमदारांकडून वैयक्तिकरित्या पीडितेच्या कुटुंबीयांना मदतही करण्यात आली. यावेळी आमदार किशोर पाटील यांनीही त्यांच्याकडून वैयक्तिक 50 हजाराची मदतीच्या कुटुंबीयांना केली. तसेच हा खटला लवकरात लवकर कसा निकाली लागून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं तसेच कुटुंबियांना पुनर्वसनासह शासनाची मदत मिळवून देण्यासाठी ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री अनिल पाटील यांचा आमदार किशोर पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले.
इतर संबंधित बातम्या :