Yashraj Mukhate New Song: 'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका..'; यशराज मुखाटेचं नवं गाणं, व्हिडीओ व्हायरल
चित्रपटातील सिन्स, कलाकारांचे डायलॉग्स या सर्वांना म्युझिकल ट्विस्ट देण्याऱ्या यशराज मुखाटेनं (Yashraj Mukhate) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Yashraj Mukhate New Song: PUBG खेळताना प्रेमात पडलेल्या भारताचा सचिन आणि सीमा हैदर (Seema Haider) यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात होत आहे. सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर अनेक मीम्स, व्हिडीओ नेटकरी तयार करत आहेत. चित्रपटातील सिन्स, कलाकारांचे डायलॉग्स या सर्वांना म्युझिकल ट्विस्ट देण्याऱ्या यशराज मुखाटेनं (Yashraj Mukhate) नुकतेच सचिन आणि सीमा हैदर यांच्याबाबत एका महिलेनं केलेल्या कमेंटवर गाणं तयार केलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेनं सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर टीका केली होती.'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका' असं म्हणत तिनं सचिनवर टीका केली. त्यानंतर या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या महिलेच्या 'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका' या डायलॉगवर आता यशराज मुखाटेनं एक गाणं तयार केलं आहे. या गाण्यात महिलेचा डायलॉग आणि संगीत ऐकू येत आहे. यशराजच्या या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नेटकरी यशराजच्या या गाण्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
रसोडे मै कौन था, साडा कुत्ता हे यशराजनं एडिट केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या व्हिडीओला नेटकऱ्यांसोबतच सेलिब्रिटींची देखील पसंती मिळाली. आता यशराजच्या 'लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका' गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
यशराजनं शेअर केलेल्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ये क्या बना दिया भाई' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तिचा आवाज न बदलल्याबद्दल धन्यवाद...तिच्या आवाजात बऱ्याच भावना आहे.'
सीमा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: