Pritish Nandy Death : प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pritish Nandy Passes Away : प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते प्रीतिश नंदी यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं आहे. यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
Pritish Nandy : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार आणि चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतली. 8 जानेवारी 2025 रोजी त्यांचं निधन झालं. पत्रकार ते चित्रपट निर्माते असा प्रीतिश नंदी यांची प्रवास होता. त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची माहिती देणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही चित्रपट निर्मात्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रसिद्ध निर्माते प्रीतिश नंदी यांचं निधन
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पत्रकार प्रीतिश नंदी यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं संध्याकाळी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. प्रीतिश नंदी यांनी चमेली, सूर आणि हजारों ख्वाहिशें ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स यासारखे चित्रपटांची निर्मिती केली होती. अनुपम खेर, करीना कपूर, हंसल मेहता, अनिल कपूर, नील नितीन मुकेश यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
निर्मात्याच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर प्रीतिश नंदी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावनिक पोस्टमध्ये लिहिलं आहे, "माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रीतिश नंदी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले आणि धक्का बसला. एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार. तो माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळाचा एक भाग होता. मुंबईत घालवलेले दिवस, तो माझा सर्वात मोठा आधार होता आणि माझ्या ताकदीचा सर्वात मोठा स्रोत होता. आमच्यात अनेक गोष्टी समान होत्या." असं म्हणत अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :