एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान

Chandrakant Patil vs Rohini Khadse : गेली 40 वर्ष एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे (Muktainagar Assembly Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यासोबत लढत होणार आहे.  40 वर्षानंतर प्रथमच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आली आहे. 

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. गेली 40 वर्ष एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

महायुतीचे सरकार पुन्हा येऊ दे, अशा प्रकारचं साकडं आज आपण संत मुक्ताई चरणी घातले आहे. संत मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन आपण आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याच बरोबर प्रचाराचा शुभारंभ करत असल्याचे मुक्ताईनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विकासाच्या मुद्यावर आपण ही निवडणूक लढविणार आहोत. खडसे परिवारावर आज आपण बोलू इच्छित नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

आपलाच विजय होणार : रोहिणी खडसे 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी म्हटलं की, उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती आज होईल. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशाने आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत. आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेऊन आपण अर्ज भरत आहोत. जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपलाच विजय होईल, असा विश्वास ही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. 

आणखी वाचा 

मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Nomination Form | राज ठाकरेंच्या उपस्थितीत अविनाश जाधव भरणार उमेदवारी अर्जSameer Bhujbal : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 तारखेला भरणार अर्जYashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शनRaju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी  Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का, चिपी-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद; नेमकं कारण काय?
Priyanka Gandhi Net Worth : प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
प्रियांका गांधी किती कोटींच्या मालकीण? संपत्तीचा आकडा समोर; राॅबर्ट वाड्रांच्या नावे 66 कोटींची मालमत्ता
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली
Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
Embed widget