Jalgaon News : नील गायींचा कळप धावत आला, बैलजोडी घाबरून उधळली अन् थेट विहीरीत कोसळली; दोन बैलांचा अंत
Jalgaon News : नील गायींचा कळप धावत आल्याने त्या भीतीने बैलजोडी बिथरली यानंतर बैलजोडी जोडी पळत सुटल्याने थेट बैलगाडीसह विहिरीत जाऊन कोसळली. या घटनेत बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जळगाव : नील गायीचा समोरून धावत आल्याने बैलगाडीला जुंपलेली बैलजोडी थेट पळत सुटून विहीरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेत दोन बैलांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बैलगाडीसह बैलजोडी विहीरीत कोसळल्याने बैलांचा जीव गेला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खांडवेमध्ये घडली. खांडवे येथील शेतकरी अरुण पर्वते चारा आणण्यासाठी बैलगाडीसह शेतात गेले होते. त्यांनी आपली बैलगाडी शेतात उभी केली होती. त्याचवेळी नील गायींचा कळप धावत आल्याने त्या भीतीने बैलजोडी बिथरली यानंतर बैलजोडी जोडी पळत सुटल्याने थेट बैलगाडीसह विहिरीत जाऊन कोसळली. या घटनेत बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेसीबीच्या मदतीने बैलगाडी व बैलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या























