Jalgaon : मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात पोहचला, त्यानंतर....
Jalgaon : खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बुरखा घातलेल्या संशयितांना अटक केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Jalgaon Latest Crime News Update : मुलाचा खून करणार्याला न्यायालयाच्या आवरात गोळीबार करून संपवण्याचा प्रयत्नात असलेल्या बापाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या सतर्तकतेमुळे मोठा अनर्थ पोलिसांच्या सतर्कतमुळे टळला आहे, या घटनेत कुणालाही संशय येवू नये म्हणून दोघा संशयितांनी मुस्लिम महिलाचा पेहराव केला होता. त्याप्रमाणे बुरखा घालून न्यायालय परिसरात दबा धरून बसले होते. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या घटनेत एका जणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 5 जिवंत काडतूस आणि गावठी कट्टा जप्त केला आहे. मनोहर दामू सुरळकर (वय 45) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात असलेल्या धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19 रा. पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाची गोळीबार तसेच चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 22 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली घडली होती. या घटनेत मयत धम्मदिप याचे वडील मनोहर दामू सुरळकर (वय 45) हे जखमी झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर, भुसावळ या दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ते कारागृहातच होते.
आज या खटल्याची तारीख असल्याने शेख समीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना आज जळगाव कोर्टात हजर करण्यात येणार होते. याची माहिती मयत धम्मदीप याचे वडील मनोहर सुरळकर यांना मिळाली. मुलाचा खुनाचा राग त्यांच्या डोक्यात कायम असल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच, आज मुलाचा खून करणाऱ्या दोघांना संपविण्याचा त्यांनी प्लॅन रचला होता, त्यानुसार मनोहर सुरळकर व सुरेश रवी इंधाटे हे कुणालाही संशय येवू नये, म्हणून दोघे चक्क बुरखा घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात कोर्ट परिसरातल्या मंदिराजवळ बसले होते.
मंदिराजवळ बसलेल्या या मुस्लिम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिली. यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी कारवाई केली. गोळीबार करून खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली. याप्रसंगी झालेल्या झटापटीत मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली आहे, त्यांच्यासोबत असलेला सुरेश रवी इंधाटे याने तेथून पळ काढला. मनोहर सुरळकर याची झडती घेतली असता त्याच्याकडे पर्स आढळून आली. यात एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस आढळून आले. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे.























