एक्स्प्लोर

शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली

Girish Mahajan on Shiv Sena Rebel: शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे.

Girish Mahajan on Shiv Sena Rebel: शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणालाही कलाटणी मिळाली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडानंतर दोन गट तयार झाले. एक ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि दुसरा शिंदे गट (Shinde Group). एकनाथ शिंदे यांच्यासह 40 ते 50 आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. भाजप (BJP) आणि शिंदे गट यांच्या युतीचं सरकार. अशातच ठाकरे गटाकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला जात होता. अशातच आता याची कबुलीच भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

शिवसेनेचे दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं. हे गुपित मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जळगावातीव एका सभेत बोलताना सांगून टाकलं. महत्त्वाची बाब म्हणजे, या सभेला मंत्री गिरीश महाजनांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मंत्री गुलाबराव पाटीलही (Gulabrao Patil) उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचं महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याची कबुली दिली आहे.  

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होताच." 

"हे सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं? असं वाटायचं. मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे. आम्ही कसे असतो, तुम्हाला माहिती आहे.", असं गिरीश महाजन म्हणाले. हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला. मात्र लोक आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहिले,  त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद, प्रार्थना या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होत्या. हे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना शेरोशायरी ऐकवली.  

याच सभेत गिरीश महाजनांचा शायराना अंदाजही पाहायला मिळाला. "कदम कदम पे ऊरजो जबान देता है. हर बला से मुझको बचा लेता है... पता नहीं कीसकी दुवाओ फैज है मुजपर... डूबने लगता हु... तो दरिया उछाल देता है..." ही शायरी ऐकवत, अशीच लाट आली आणि एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली अन् ते थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच विराजमान झाले, असंही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 

मंत्री गिरीश महाजन याची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

गेल्या अडीच वर्षांचा कारभार बघितला, तर मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढली नाही. घरून काम करतो. कॉम्प्युटरवर काम करतो, असंच काम त्यानी केलं, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एकनाथ शिंदे यांना मी सांगतो किमान चार तास तरी झोपा, पाच तास तरी झोपा. मात्र ते तीन-तीन वाजेपर्यंत काम करतात, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत, असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय की, खऱ्या अर्थानं जाणता राजा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करता आहेत, असंही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CM Eknath Shinde on Gulabrao Patil: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? महाजन, चव्हाणांचं नाव घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Camp Vs MNS: मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Camp Vs MNS: मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget