(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde on Gulabrao Patil: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? महाजन, चव्हाणांचं नाव घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड
CM Eknath Shinde on Gulabrao Patil: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? ॲम्बुलन्स, गुवाहाटी अन् मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजनांची मदत... मुख्यमंत्र्यांनी स्वतःच केलं उघड
CM Eknath Shinde on Gulabrao Patil: शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात मोठा राजकीय (Maharashtra Politics) भूकंप झाला. शिवसेनेतील एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काही आमदारांसह बंड केला आणि शिवसेनेत दोन गट पडले. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) कायम आहे. बंडानं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं.
स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आताच्या ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. आजही राज्यात दोन गटांमधील संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच शिवसेनेतील एक मोठं नाव, आमदार जे आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) होते, पण दुसऱ्याच दिवशी थेट गुवाहाटीला जाऊन पोहोचले. ते आमदार म्हणजे, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil). यांनी गुवाहाटी गाठल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra News) आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? हे खुद्द केलं आहे.
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे गुहाटीला कसे आले? याचं गुपित खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावच्या सभेत बोलताना उघड केलं आहे. गुलाबराव पाटील यांना माझ्यासोबत येताना अडचणी खूप आल्या. ते कसे आले, ते मी सांगत नाही. मात्र जिद्द आणि चिकाटी असली की ते ध्येय साध्य होतंच, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावेळी त्यांची तब्येत बरोबर नसतानाही मंत्री गुलाबराव पाटील यांना आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण, गिरीश महाजन यांनी प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. ॲम्बुलन्सद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांना नेण्यात आल्याचा गौप्यस्फोटही यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनतर जे काय घडल ते सर्व जगाला माहीत आहे आणि तेव्हापासून लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत लोकांना माहीत झालं की, एकनाथ शिंदे कोण आहे, असंही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत गुवाहाटी दौऱ्याचा उल्लेख केला.
"आम्ही धाडसानं निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केलं. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा. बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे. आपण सर्व बडगुजर एकत्र केले तर गुजरची किती मोठी ताकद होईल.", असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं.
गिरीश महाजनांवर मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं
"आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. सर्व खेळ खेळणारा माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री", असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांवर कौतुकाचा वर्षाव केला.