एक्स्प्लोर

Jalgaon Crime News : वसतीगृहाच्या काळजीवाहकाकडून 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अधिक्षिका पत्नीनं लपवला प्रकार

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात खडकी गावात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात काळजीवाहकानेच पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील खडकी गावात मुलींचे वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत बुधवारी स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणाऱ्या त्याची पत्नी जी वसतीगृहाच्या अधीक्षका आहे, तसेच सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर, संशयित आरोपी अटकेत आहेत. पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आलं आहे.

काळजीवाहकाकडून पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार

एरंडोल तालुक्यात खडकी गावात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात काळजीवाहकानेच पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आल्याने पोलिसांनी आरोपीसह साथ देणाऱ्या दोघांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वसतीगृहातील मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेश शिवाजी पंडित असं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचं नाव आहे.

मुलींच्या वसतीगृहातील धक्कादायक प्रकार उघडकीस

एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वसतीगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वसतीगृह बंद पडल्यानंतर या वसतीगृहात दाखल पाच मुलींना जळगाव आतील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी मुली या ठिकाणच्या वातावरणात रुळ्ल्या. विश्वास संपादन झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधार गृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतीगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. 

आरोपीच्या अधिक्षिका पत्नीनं लपवला प्रकार

हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. 2022 ते वसतीगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा काळजीवाहक  गणेश पंडीत याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधिक्षिका आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या जून महिन्यात वसतीगृह बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दाखल असलेल्या पाचही मुलींना जळगाव मुलींचे निरीक्षण गृह याठिकाणी दाखल करण्यात आले आहेत, रवानगी करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींचे जबाब घेण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाला अटक करण्यात आली आहे. शासनाची मान्यता असलेले सदरची वसतीगृह हे एका खाजगी संस्थेचे असून ते जून महिन्यात बंद पडले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर  2024: ABP MajhaBaramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहितीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget