(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा?' एकनाथ खडसेंचे महाजनांवर पुन्हा गंभीर आरोप
Eknath Khadse : सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद हा चांगलाच पेटत चाललाय. त्यातच सलीम कुट्टा प्रकरणावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगलाय.
मुंबई : एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच ज्याप्रकारे माझी चौकशी करण्यात आली त्याचप्रकारे गिरीश महाजनांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील गिरीश महाजन यांनी केलीये. मंत्री या नात्याने तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग केल्याचं एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं.
सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद हा चांगलाच पेटत चाललाय. त्यातच सलीम कुट्टा प्रकरणावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगला. यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. एका सामान्य शिक्षकाचा मुलगा शेकडो कोटी मालमत्तेचा मालक कसा असा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय.
'सरकारचा उपयोग नाथाभाऊला बदनाम करण्यासाठी करता का?'
राज्यात विविध प्रश्न असताना नाथाभाऊ एवढा तुमच्यासमोर असेल तर मग सरकारचा सारा उपयोग नाथाभाऊला बदनाम करण्यासाठी करता का ? असा सावल देखील एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना केलाय. सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी केली जात आहे, तशीच च महाजन यांची सुद्धा चौकशी होऊ द्या. दहशतवादी कृत्य गिरीश महाजन यांनी केले आहे यापूर्वी गिरीश महाजन हे मोक्याचे आरोपी आहेत. दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाबरोबर तुम्ही जेवण केलं होतं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय.
ज्या पद्धतीने माझी चौकशी करण्यात आली तशीच गिरीश महाजन यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाबरोबर गिरीश महाजन यांनी जेवण केलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नसून मंत्री पदाचा दुरुपयोग गिरीश महाजन यांनी केल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. तसेच मोक्याच्या गुन्ह्यातील गिरीश महाजन हे आरोपी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने गिरीश महाजन वाट्टेल ते बोलत असल्याचे खडसे म्हणाले.दरम्यान राज्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असताना फक्त नाथाभाऊ एवढा तुमच्यासमोर असेल तर मग सरकारचा सारा उपयोग नाथाभाऊ ला बदनाम करण्यासाठी करता का ?असा सवाल देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे